वरणगावमध्ये वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार :वारंवार वीज खंडीत होण्याचा प्रकार वाढला; शिवसेनेने विचारला जाब

वरणगाव – येथील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरात वारंवार वीज खंडीत होण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रकारमुळे शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी वीज वितरण कार्यालय गाठून महावितरणच्या अधिकाऱ्याला वीज खंडीत का होते? याचा जाब विचारून वीज वितरणच्या अभियंत्यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सद्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरु आहे. विद्यार्त्यांच्या परीक्षा देखील सुरु आहेत. आगामी काळात श्रीराम नवमी, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती असे सण उत्सव येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात गेल्या पाच सहा दिवसापासून वीज वितरण कंपनी कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता दिवसा-रात्री अपरात्री चार ते पाच तास वीज खंडीत होते. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या ग्राकांसाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास त्या नंबरवर उडवा उडविचे उत्तर दिले जातात नाही तर तो मोबाईल बंद असतो. या सर्व प्रकारमुळे वरणगावकर जनता त्रस्त झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला तर त्यांनाही खंडीत झालेली वीज कधी येईल हे सांगता येत नाही? या सर्व वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज शनिवारी दुपारी वरणगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी वीज वितरणचे कार्यालय घाठून येत्या आठ दिवसात हा गलथान कारभार सुरळीत नाही झाल्यास शिवसेना स्टाईलने वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.

निवेदनावर जिल्हाप्रमुख समाधान महाजन, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्याक संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, सुरेश चौधरी, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख कालू शर्मा, माजी उप शहरप्रमुख सुनील भोई, माजी ग्रा. पं. सदस्य विलास वंजारी, सुनील देवघाटोळे, गोली भोई, गोविंदा चौधरी, वैभव लोखंडे, सुफियान शेख, उप शहर संघटक भुषण बाविस्कर, दिपक शेडके, पंकज चौधरी यांच्यासह शिवसैनिकाच्या स्वाक्षऱ्या आहे.