महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्रीमीनेष भगवान यांच्या मुर्तिची भुसावळात स्थापना :


भुसावळ- येथिल तापी नदी काठावर गुरुवारी शहरातील तापीनदी श्री मीनेष भगवान यांच्या मुर्तीची प्राणप्रतीप्ठा करुण मोठया थाटामाटात श्री मीनेष भगवान की जय या जय घोषात स्थापना करण्यात आली.

श्री मीनेष भगवान हे श्री विष्णु भगवान चा प्रथम अवतार असल्याचे मानले जाते,त्यामुळे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही भव्य दिव्य व भर उन्हात महीलांनी पायात काही न घालता कलश मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र,मध्य प्रदेश,गुजरात,उत्तर प्रदेश सहित राजस्थान व अन्य राज्यातील मीना समाजाचे पंच पटेल व महिला शक्ती व लहान मुलं हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या पंचकर्माद्वारे व रेल्वेचे अप्पर मंडळ रेल प्रबंधक रुकमैय्या मीना यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने भुसावळ तील तापी नदीवरील पवित्र स्थळी रेल्वे पंप हाऊस जवळ श्री मीनेष भगवान ची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करण्यात आली,या भव्य दिव्य समारंभात राष्ट्रीय मीना उत्थान मंच चे सर्व सदस्य व महानुभाव उपस्थित होते.यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.श्री मीनेष भगवान ची मूर्ती हि राजस्थान येथून सरस्वती नदी अलबट झीरींगाव च्या संगमरवर या दगडाने ९० किलो वजनाची भव्य दिव्य मूर्ती बनवण्यात आली आहे. या मूर्ती ची उंची सव्वा तीन फूट असून ती मतस्यवर आरूढ आहे.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.