भुसावळ – महिला पर्यावरण सखी मंचच्या वतीने शुक्रवार रोजी आज दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता अनोखा व कौतुकास्पद चैत्र उपक्रम साजरा करण्यात आला . यानिमित्त तुम्ही आम्हाला पाणी द्या ,आम्ही तुम्हाला सावली देऊ, असे संदेश फलक लावण्यात आले.
यावेळी जामनेर रोड वर असलेल्या दुभाजकावरिल झाडांना पाणी देण्यासाठी रिकाम्या प्लास्टिक बॉटलचा पुनर्वापर करून त्या बॉटलला झाडाच्या बुंध्याशी बांधून पाण्याची सोय केली.
प्रसंगी झाडाजवळ तुम्ही आम्हाला पाणी द्या आम्ही तुम्हाला सावली देऊ, फुले देवू, ऑक्सिजन देवू, फळे देवू, असे संदेश लिहिलेले फलक सुद्धा लावण्यात आले रिकाम्या प्लास्टिक बॉटलचा वापर करून उन्हाळ्यात झाडे सुकून कोमेजू नयेत म्हणून झाडांना पाण्याची सोय करून दिली.
जामनेर रोड वरील संपूर्ण दुभाजकांवर लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा , ” तुम्ही आम्हाला पाणी द्या आम्ही तुम्हाला सावली देऊ , असे फलक लावून झाड़े जगवा असे आवाहन केले. यामुळे जाणारा येणारे नागरिक सुद्धा थांबून सखीमंचने झाडांना ज्या बॉटल्स बांधल्या आहेत त्यात पाणी टाकणार आहे. तसेच या परिसरातील सर्व पर्यावरण सख्या सुद्धा त्या झाडांना पाणी टाकण्याचे काम नित्यनियमाने करणार आहेत.
याकामी पर्यावरणाच्या सर्व सख्यांनी घरून फलक तयार करून आणने, बॉटल्स कापून आणणे, कैची ,दोरा, सुरी, कात्री, कटर, स्केचपेन, आदी वस्तू सर्व न चुकता पहाटे साडेसहाला आणल्या सर्व वेळेवर उत्साहात उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. असेच कार्यक्रम दर आठवड्याला वेगवेगळ्या विभागात करण्याचा महिला पर्यावरण सखी मंच भुसावळ शहर मैत्रिणींचा मानस आहे .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा शालिनी वाडेकर, कार्याध्यक्षा आरती चौधरी, उपाध्यक्ष स्वाती भोळे, सचिव प्रियंका चौधरी तसेच विजया निकम, शीतल अरोरा, रिता नाईक, भारती चव्हाण, मंजू सुरळकर, आरती देशपांडे, जया इंगळे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, प्रचना तांबोळी आदी सख्यांनी परिश्रम घेतले .



