भुसावळ – जनसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मराठी नववर्षानिमित्त अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. धिरज पाटील व आर्या ऍडव्हान्स ओडोंटो केयरच्या संचालिका डॉ. रिना पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोनशेहून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या आरोग्यविषयीच्या समस्यांचे समाधन करून घेतले. प्रभागातील महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरीकांनी शिबिरात लक्षवेधी उपस्थिती दर्शवली होती. श्री रिदयम हॉस्पिटल तर्फे डॉ.कुशल पाटील, डॉ. मनीष रगडे यांनी शिबिरात ६९ जणांची मधुमेह, रक्तदाब व प्राथमिक तपासणी केल. डॉ. सुनील मेश्राम यांनी नेत्रम हॉस्पिटलतर्फे ८९ रुग्णांनी नेत्र तपासणी केली, त्यात २४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ६५ नागरिकांनी दंत तपासणी केली.
अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश वारके, प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील, शहर सचिव सचिन पाटील, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी, प्रवीण भोळे, सतीश सपकाळे, विशाल ठोके, विशाल जंगले, अनिकेत पाटील, जितेंद्र सपकाळे, बबलू बऱ्हाटे, उदय बोंडे, पितांबर पाटील, चंद्रशेखर पाटील, राहुल फालक, यश फालक, गणेश पाटील, पवन बाकशे, कपिल भिरुड उपस्थित होते.
दात स्वच्छ करण्याची काळजी घ्या: डॉ.पाटील
डॉ. रीना पाटील यांनी यावेळी संगितले की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण अन्न पदार्थ खाण्याचा आनंद दातांचा वापर करून घेतो. पण जेव्हा ते स्वच्छ करण्याची वेळ येते तेव्हा आपण फारच कमी वेळ देतो. दातांच्या दुखण्याकडे वेळीच लक्ष दिल्यास दात दिर्घकाळ टिकू शकतात.
यांनी घेतले परिश्रम:
अमित जावरे, संदीप भोई, कैलास पाटील, अमोल पाटील, सागर वाघोदे, लोकेश वाणी, धनेश पाटील, गिरीष राणे, विशाल सपकाळे, पवन ढंढोरे, निलेश कोळी यांनी परिश्रम घेतले.



