भुसावळ – भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा दर्गा जवळ एक गावठी कटटा व सहा जिवंत काडतुसासह एकास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले .
शहरातील घोडेपीर बाबा दर्गा जवळ आज 1 एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी 03.30 वाजता संशयीत आरोपी
मझर शकील कुरेशी रा. मोतीराम नगर , भुसावळ याचे ताब्यातून 15,000 /-रुपये किमतीच्या गावठी कट्टयासह 3,000/-रुपये किमतीचे सहा जिवंत काडतुस मिळून आले.
सदरची कारवाई ही पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय नेरकर, पोलीस हवालदार रमण सुरळकर पो.नाईक निलेश चौधरी , उमकांत पाटील, पोलीस कर्मचारी . प्रशांत परदेशी,पोलीस कर्मचारी प्रशांत सोनार चालक एएसआय अयाज सय्यद यांनी केली .



