भुसावळ – रेल्वेने ट्रेन क्रमांक 12519/12520 लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या वातानुकूलित एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डब्यांसह कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

12519 लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या एसी एक्सप्रेस दि. ३.४.२०२२ पासून आणि
12520 कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस एसी एक्सप्रेस दि. ३१.३.२०२२२ पासून.
ट्रेन क्रमांक 12519/12520 ची सुधारित संरचना खालीलप्रमाणे असेल:
१ प्रथम वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १४ तृतीय वातानुकूलित एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर कम गार्ड ब्रेक व्हॅन.
प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांची पीएनआर स्थिती तपासण्याची विनंती केली जात आहे.


