भुसावळ – धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व भुसावळ पोलीस उपविभाग गावांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते.या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाहिजे आरोपी अटक करणे अटकपूर्व जामीन आतील आरोपी अटक करणे,अवैध धंद्यांवर कारवाई करणे, अवैध अग्निशस्त्र तलवारी इत्यादी जप्त करणे हिस्ट्री सीटर चेक करणे, तडीपार गुन्हेगार चेक करणे , अशा विविध कारवाया करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते.
त्यानुसार उपविभागातील चारही पोलिस स्टेशन मधील पोलीस प्रभारी अधिकारी, अन्य अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस अंमलदारांनी वेगवेगळ्या शीर्षकाखाली विविध कारवाया केल्या आहेत. त्यापैकीच अवैध दारू धंद्यांवर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दोन याप्रमाणे आठ कारवाया धुळवड शुक्रवार रोजी एकाच दिवशी करण्यात आलेल्या आहेत.
याकारवाईत तालुका पोलीस स्टेशन हद्द येथे
1) गुन्हा रजिस्टर नंबर 35/2022 कलम 65 ई, ठिकाण- फौजी ढाबा, जप्त मुद्देमाल एकूण 15040/- रुपयाची देशी-विदेशी दारू ,
तसेच दूसरा गुन्हा रजिस्टर नंबर 36 / 2022,आरोपीचे नाव महेंद्र अनिल चौधरी, राहणार गोजरा, हॉटेल आसरा कुरा शिवार,जप्त मुद्देमाल- 16090/- रुपयाची देशी-विदेशी दारू
भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन हद्द येथे दोन गुन्हे यात
गुन्हा रजिस्टर नंबर 190/ 2022 कलम 65, आरोपी चे नाव होलाराम जीवनराम सचदेव, राहणार सिंधी कॉलनी
-घटनास्थळ हॉटेल अंगारा
-जप्त मुद्देमाल 2880 रुपयाची दारू, तर दूसरा गुन्हा रजिस्टर नंबर 185/ 22 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायदा
आरोपीचे नाव दिलीप पांडुरंग पाटील राहणार गौतम नगर -घटनास्थळ गंगाराम प्लॉट -मुद्देमाल 26 लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत 2560/-
आणि नशिराबाद पोलीस स्टेशन येथे आरोपी किरण सुरेश सपकाळे वय 28 रा.इंदीरानगर जळगाव खुर्द याचेविरुद्ध गु.र.नं.22/2022 प्रोव्हि 65 ई प्रमाणे मिळाला माल 600 रु. कि .ची.15 लिटर गावठी हातभट्टी ची दारु मिळाली तसेच गु.र.नं.23/2022 प्रोव्हि 65 ई प्रमाणे मिळाला माल 750 कि.ची .25 लिटर गा.ह.भ. ची दारु.
आरोपी- गणेश हरचंद ठाकुर वय 45 रा.इंदीरानगर जळगाव खुर्द
भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील अवैध दारू विक्री विरुद्ध 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई जिल्हा परिषदेचे डॉ . प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन , पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, नशिराबाद पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, रुपाली चव्हाण, सपोनी अमोल पवार, सपोनी दुनगुहू, सपोनी गोंटला, सपोनी गोसावी, एएसआय चौधरी, पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस नाईक यासिन पिंजारी,पोलीस नाईक रमण सुरळकर यांनी केलेली आहे.



