धुलिवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा करावा- उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे : विभागातील नागरिकांना आवाहन :


भुसावळ – होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर उत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही व शांततेस गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .
भुसावळ शहर तसेच भुसावळ उपविभागामध्ये पोलीस विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. नाकाबंदी दरम्यान मद्य प्राशन करून वाहन चालवीणारे ( drunk and drive,) विना सायलेन्सर असणाऱ्या गाड्या, विनाकारण रोडवर फिरणाऱ्या तरुणांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे .
त्याशिवाय शहरांमध्ये सर्वच धार्मिक स्थळी फिक्‍स पॉइंट लावण्यात आलेले आहे तसेच मोकळी मैदाने, बस स्टॅन्ड, बाजारपेठा याठिकाणी पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तरी भुसावळ विभागातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की उद्याचा धुलिवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा करावा. उत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही व शांततेस गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .