भुसावळ – बाजरात माेठ्या प्रमाणावर फसवणूक हाेत असते, त्यासाठी फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी अाणि फसवणूक झालेल्यांवर ताेडगा काढण्यासाठी प्रत्येक प्रभागात गृप तयार करण्याची गरज अाहे. त्या गृपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांवर ताेडगा काढता येणार अाहे, शासन दरबारी सुध्दा फसवणूकीची माहिती देणे गरजेचे अाहे. जाेपर्यत जागृती हाेत नाही ताेपर्यत फसवणूकीचे प्रकार सुरूच राहणार अाहे. यासाठी नागरिकांनी जागृत हाेण्याची गरज अाहे. ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक प्रभागात नागरीकांनी गृप तयार करण्याची गरज अाहे, त्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या दूर हाेऊ शकतात. यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज अाहे, असे प्रतिपादन प्रा. प्र.ह. दलाल यांनी केले. ते येथील तहसील कार्यालयात अायाेजीत जागतिक ग्रहक दिनाच्या निमीत्त अायाेजीत केलेल्या कार्यक्रमात बाेलत हाेते, अध्यक्षस्थानी तहसीलदार दीपक धिवरे हाेते.
येथील तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी ११ वाजता जागतिक ग्राहक दिनानिमीत्त विशेष कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना भाऊसाहेब शिरसाठ यांनी केली. यावेळी कार्यक्रमास माेठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती हाेती.
यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जिल्हा सचीव अॅड. जास्वंती भंडारी यांनी अाॅन लाईन वस्तू खरेदी करतांना काय काळजी घ्यायला पाहीजे, यावर मार्गदशर्न केले. माेबाईल मध्ये अनेप प्रकारचे अाॅनलाईन अॅप अले अाहे, त्याताही काही फेक सुध्दा अाहे, त्यामुळे नागरिकांनी जागृत राहून अाॅनलाईन खरेदी करतांना काळजी घ्यावी, असे अावाहन केले. ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष कीरणकुमार बाेलके यांनी त्यांच्या मगाेगतात सांगितली की, फुडविक्रीचा परवाना काढतांना त्यांचे प्रशिक्षण सुध्दा घेणे गरजेचे अाहे, मात्र अापल्याकडे प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. ते करणे गरजेचे अाहे. अॅड. कल्पना टेमाणी यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
नागरिक जागृत हाेत अाहे
बदलत्या काळात नागरीक सुध्दा जागृत हाेत अाहे. ग्राहक चळवळ दिवसे दिवस वाढत अाहे. नागरीकांनी सुध्दा अाता जागृत राहून अाॅनलाईनच्या माध्यमातून अापली फसगत हाेणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे अाहे. दिवसे दिवस अाॅनलाईन खरेदीककडे जास्त कल वाढत अाहे. त्यामुळे फसवणूकीचे प्रकारही अधीक हाेत अाहे, यासाठी ग्राहकांनी अापली फसगत हाेणार नाही, अश्या कंपन्यांकडून माल खरेदी करावा, मात्र दक्षता घ्यावी, असे अावाहन तहसीलदार दीपक धिवरे यांनी केले.



