वरणगावात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न : यशश्री बहुउद्देशिय संस्थेचा स्तुत्य उपक्रम :


वरणगाव – येथील यशश्री बहुउद्देशिय संस्था वरणगाव व विधि सेवा समिती , दक्षता समिती यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यां कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला .
सावता माळी सभागृह वरणगाव येथे आयोजित आरोग्य शिबिरात महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यामध्ये थायरॉइड , ब्लड प्रेशर , मधुमेह (शुगर ) रक्त तपासणी करण्यात आली . यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते आशा सेविका संजीवनी चौधरीं , वत्सला रामभोले, नंदा भोई , यांच्यासह अनेक महिलांचा सत्कार केला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समन्वय समितीच्या सौ भारती म्हस्के होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव सौ अरुणा इंगळे ,दूध फेडरेशनच् सदस्या श्यामल झांबरे , सामाजिक कार्यकर्त्यां शारदा माळी , रोहिणी जावळे , वैशाली देशमुख , प्रतिभा चौधरीं , दक्षता सदस्य शिला बारी , मनीषा , दिपाली , आदीं मान्यवर उपस्थित होते .
यावेळी सौ म्हस्के यांनी भादवी कायदा 498 याबाबत महिलांना मार्गदर्शन करीत शक्यतो घटस्फोट होणार नाही याबद्दल दोन्ही बाजुचे परिवार यांनी सामंजस्याने विचार करावा असे आवाहन केले . यावेळी वरणगाव परिचारिका ज्योती गुरव , सहकारी दिपक माळी यांनी सहकार्य केले तर शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्यां शारदा गंभीर माळी यांनी केले.

शारदा नंदिनी नागरे , शितल नाईक ,अर्चना माळी , यानी सहकार्य केले . मंदा पवार , योगिता नाईक,सीमा माळी , माधुरी माळी , शारदा व्ही माळी , सुशीला फालक,
,रेखा माळी , योगीता जोशी , शालिनी कुलकर्णी , शालिनी सोनगिरकर , शालिनी कुलकर्णी , साधना सोनगिरकर भारती माळी, सुलभा देशमुख , सुनीता पले , मनीषा चौधरीं , अरुणा पाटिल ,
सोनाली वंजारी , कविता माळी ,पार्वता बाई ज्योति माळी , अनुसायाबाई, शेनफडाबाई ज्योती माळी शैला माळी , सुनीता माळी , संगीता चौधरीं , जीजाबाई शीतल मराठे, पल्लवी माळी , शैलजा मनीषा चौधती , आशा चौधरीं , वंदना चौधरीं , सुनंदा नागरे , शारदा नागरे , माधुरी नागरे , यांनी शिबिरात उपस्थित राहुन भेट दिली . सूत्रसंचलन नीताताई यांनी केले .