नाशिकरोड पोलीसांनी गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसांसह आरोपीस अटक: १ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त:

नाशिक – पोलीस आयुक्त, नाशिक यांचे आदेशान्वये नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्रे व
हत्यार बाळगणारे इसम/गुन्हेगार यांचेवर कारवाई करणेवावत कळविण्यात आलेले होते.
त्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस ठाणेचे पोलीस नाईक विशाल पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की,
रेकॉर्डवरील घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे, वय २२ वर्षे, रा.ठि. देवी रोड, ईदगाह
मैदानाच्या बाजुला, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक हा खर्जुल सर्कल व सिन्नर फाटा परिसरामध्ये आलेला असुन
त्याचे जवळ बंदुकीसारखे हत्यार असल्याची खात्रीलायक वातमी मिळालेली होती.
त्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाणेचे वपोनि अनिल शिंदे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी
सपोनि योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जावुन
सशयीत आरोपीतास ताब्यात घेवुन कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. सदर सुचनांप्रमाणे गुन्हे शोध
पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खर्जुल सर्कल या ठिकाणी साध्या वेषात जावुन सापळा रचला होता.
सदर ठिकाणी सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे हा त्याचेकडे असलेल्या मोटार सायकलवर मिळुन आल्याने त्यास
पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करुन मोठया शिताफीने
त्यास ताब्यात घेतले. त्याचे अंगझडती मध्ये एक गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुस व पल्सर मोटार सायकल
असा एकुण १ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेला असल्यामुळे त्याचेविरूध्द वशिकरोड
पोलीस ठाणेस आणल्यावर गुरनं ७१/२०२२ भाहका ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर
गुन्हयाचा पुढील तपास सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोह अनिल शिंदे व पोशि सोमनाथ जाधव हे करीत
आहे. अटक आरोपी राहुल दिलीप धोत्रे याचेवर नाशिकरोड व सिन्नर पोलीस ठाणे घरफोडी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.
ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, . पोलीस उपआयुक्त,विजय खरात व सहायक पोलीस डॉ सिध्देश्वर धुमाळ मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). गणेश व्हायदे, सपोनि योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोउनि जयेश गांगुर्डे, पोह अनिल शिंदे,
पोह मनोहर शिंदे, पोना विशाल पाटील, पोना अविनाश देवरे, पोना विष्णु गोसावी, पोशि राकेश बोडके, पोशि केतन
कोकाटे, पोशि कुंदन राठोड, पोशि सोमनाथ जाधव, पोशि सागर आडणे यांनी कामगिरी पार पाडली.