नाहाटा महाविद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहाची सुरुवात :

भुसावळ – ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” व “७५-आजादी का अमृत महोत्सव” या दोन्ही विषयांना अनुसरून राष्ट्रीय सेवा योजना आणि युवती कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन सप्ताहाचे आयोजन दि. ०८ मार्च २०२२ ते १२ मार्च २०२२ दरम्यान करण्यात आलेले आहे. या सप्ताहामध्ये लिंग समभाव, महिला सक्षमीकरण, उद्योजकतेमध्ये महिलांची भूमिका, महिलांचे सामाजिक दायित्व : काल, आज आणि उद्या, कर्तृत्ववान महिला, माझी वसुंधरा, वृक्ष संवर्धन अशा विविध विषयांवर व्याख्यान, गटचर्चा, काव्य व निबंधलेखन स्पर्धा, पोस्टर सादरीकरण, घोषवाक्य लिखाण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचा पहिला दिवस ८ मार्च २०२२, महिला दिन प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन मा. डॉ. उषा शर्मा (माजी –आकाशवाणी उद्‌घोषिका) यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका प्रा. सौ. शोभा तळेले, युवती कल्याण समिती चेअरमन प्रा. डॉ. गौरी पाटील, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ममताबेन पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख वक्त्या डॉ. उषा शर्मा यांनी “इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये महिलांसाठी संधी” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संगणकयुगाचा फायदा लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पदार्पण करताना निवडलेल्या क्षेत्राचा तसेच भाषेचा परिपूर्ण अभ्यास करावा असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. गौरी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री बजाज व आदित्य हिवरे तसेच आभारप्रदर्शन प्रा. डॉ. ममताबेन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवती कल्याण समितीचे सदस्य प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. विद्या पाटील, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. संगीता भिरूड, प्रा. पूनम महाजन तसेच रासेयो चे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अर्चना भालेराव, प्रा. स्वाती शेळके, प्रा. डॉ. अजय क्षीरसागर, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. स्वाती पाटील, प्रा. डॉ. कुंदा राणे, प्रा. स्वाती चौधरी, व इतर प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई. भंगाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.