नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

.भुसावळ (प्रतिनिधी) – समाजातील चालीरिती रुढी, परंपरा यातून समाजमनाचे व्यक्तिमत्त्व घडत जाते . अंतर्गत व बाह्यगत व्यक्तिमत्वामुळे व्यक्तिचे व्यक्तिमत्व विकसीत होत जाते. असे प्रतिपादन पु. ओं नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एम. व्ही वायकोळे यांनी केले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग व भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयच्या विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा तर्फे आयोजित केलेल्या विद्यार्थींनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा कार्यक्रमात ते अध्यक्षानावरून बोलत होते . यावेळी व्यासपीठावर जळगावच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयच्या प्रा डॉ सुनीता नेमाडे, विधि महाविद्यालयाच्या प्रा डॉ. विजेता सिंह प्रा विद्या पाटील प्रा. डॉ किरण वारके आदी उपस्थित होते . प्राचार्य डॉ. एम.व्ही वायकोळे म्हणाल्या – भारतीय संस्कृतीत कुटुंब पद्धत अतिशय महत्वाची आहे. या कुदुंब पध्दतीतूनच आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार रुजविले जातात यानंतर शाळा व महाविद्यालयात विद्यार्थांचा व्यक्तिमत्चाचा विकास होत जातो . कार्यकमाचे उद्घाटन प्रा.डॉ. सुनीता नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याथीनी संजना दोधाणी हिने केले . तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय नेहा पाटील हीने करून दिला . प्रथम सत्रात प्रा.डॉ. सुनीता नेमाडे म्हणाल्या – युवतींच्या वैचारिक प्रगल्भतेमुळे तिच्या सौंदयात भर पडत असून त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व विकसीत होते. स्पर्धेच्या युगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने परीश्रम व कठोर मेहनत घ्यावी असे आवाहन ही डॉ. नेमाडे यांनी केले . दुसऱ्या सत्रात जळगाव येथील विधी महाविद्यालयातील प्रा डॉ. विजेता सिंह यांनी सांगितले कि आपले मन,भावना, शरीर, बुद्धी,सामाजिक जाणिवा याकडे लक्ष दिले कि आपले व्यक्तिमत्व अधिक विकसीत होते . डॉ प्रफुल्ल इंगोले म्हणाले- श्रवण ,वाचन, लेखन या बाबी आत्मसात केल्यास संभाषण कौशल्य विकसीत होऊन व्यक्तिमत्त्व खुलते . यावेळी विद्यार्थ्यांनी मधून फैजपूरच्या धनाजी नाना महाविदयालयातील विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी पाटील व निकिता पाटील यांनी मनोगतव्यक्त केले . यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय विदयार्थीनी वैष्णवी बाविस्कर हीने करून दिला . फैजपूर च्या धनाजी नाना महाविद्यालय, नाहाटा महाविद्यालय, कोटेचा महाविदयालय, के नारखेडे महाविधालयातील विधार्थीनी उपस्थित होत्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या यावेळी प्रा.डॉ प्रफुल्ल इंगोले, प्रा. कल्याणसिंग पाटील, प्रा डॉ सचीन राजपुत, प्रा डॉ मनोज पाटील प्रा डॉ राजेंद्र तायडे प्रा . पुरूषोत्तम महाजन, प्रा डॉ. दिपक शिरसाठ प्रा डॉ ललित तायडे आदी उपस्थित होते . विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा डॉ . किरण वारके,अकिता पाटील हिने आभार मानले .