भुसावळ – महादेवाचे मंदिरा बाहेरील नंदी तहानलेला झालाय तो पाणी पित आहे त्याला पाणी पाजा अशी भावनात्मक अफवा जिल्ह्यात पसरल्याने अनेक श्रद्धाळू आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी महादेव मंदिर समोर असलेल्या नंदीला पाणी आणि दूध पाजल्याचा अद्भुत चमत्कार आज शनिवार रोजी शहरासह परिसरातिल अनेक महादेव मंदिरामधुन बघावयास मिळाला .
एवढेच नव्हे तर चक्क नंदीची मूर्ती सुद्धा पाणी पित असल्याचे दृश्य दिसल्याने नंदी पाणी आणि दुध पितोय अशी पुष्टी मिळाली हा प्रकार अचानक शहरात दुपारी चार वाजेपासून सुरू झाला तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता . महिला आणि पुरुष यांचेसह अबालवृद्धानीं मंदिरासमोर असलेल्या नंदीला पाणी पाजले . नंदी खरच पाणी पितो ही अफवा सोशल मिडियावर सुद्धा क्षणात सर्वत्र गावोगाव पसरली . दरम्यान खरच चमच्याने किंवा आणलेल्या तांब्याने नंदी पाणी पीत असल्याचे अनेक उपस्थित प्रत्यक्षदर्शीनीं सांगीतले . नंदीच्या मूर्तीने चमचाने तोंडासमोर धरलेले पाणी अक्षरक्ष: पिल्याने हा एक अदभुत चमत्कारच असल्याचे समजून हा हा म्हणता भाविकांची मंदिर परिसरात गर्दी वाढू लागली .
दरम्यान नंदी पाणी पित असल्याची चर्चा गावात व परिसरात वाऱ्या सारखी पसरली व महादेव मंदीरात तोबा गर्दी उसळली व प्रत्येक भाविक नंदीला पाणी पाजून महादेव व नंदीचे दर्शन घेण्यासाठी धडपड करीत होता . नंदी अचानक समोर धरलेले चमच्यातील पाणी कस पितोय हा संशोधनाचा विषय आहे.
श्रद्धा असणे ही बाब जरी सार्थ असली तरीही समाजात अंधश्रद्धा पसरवीने हे कितपत सत्य आहे ? हे मात्र शोधलेच पाहिजे असाही सुर काही सुज्ञ नागरिकामधुन यावेळी उमटत होता .



