भुसावळात लक्झरी खड्ड्यात : हॉटेल स्वराज्य समोरील घटना : मोठा अनर्थ टळला –

भुसावळ – भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील हॉटेल स्वराज्य समोर लक्झरी खड्ड्यात गेल्याने मोठा अनर्थ तळल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की,रावेर वरून जय मुक्ताई ट्रॅव्हल एम एच.09 सी.ए.1812 ही सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पुणे जाण्यासाठी निघाली असता सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान भुसावळ येथे जळगाव रोड

वरील हॉटेल स्वराज्य समोर लक्झरी चालक चुकीच्या मार्गाने वळण घेऊन जामनेर मार्गाने जात असताना ही घटना घडली या घटनेमुळे लक्झरी मधून प्रवास करणारे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहन चालकाच्या चुकीमुळे खड्ड्यात लक्झरी गेल्याने प्रवाशांनी जोर-जोरात आरडा-ओरड केली.प्रवासी भयभीत झालले होते या घटनेमध्ये प्रवाशांना कुठलीही दुखापत झालेले नसून एक मोठा अनर्थ टळल्याची घटना घडली . यावेळी पत्रकार संतोष शेलोडे यानी क्रेन मिळवून देण्याकरीता संबंधिताना संपर्क साधून मदत केली.