भुसावळात नुपूर रौप्य महोत्सवाचे आयोजन :


भुसावळ – येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुुद्धा नुपुर महोत्सवाचे आयोजन महाशिवरात्री मंगळवार दि १मार्च रोजी करण्यात आले आहे. या वर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असुन शहरातील बि. व्ही खाचणे हाॕल, स्वामी समर्थ मंदिरा शेजारी ,टिंबर मार्केट येथे सायंकाळी सात वाजता होईल. या महोत्सवात शास्त्रीय नृत्याद्वारे शीव आराधना केली जाते. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अनेक राज्यातील कलावंतांचा सहभाग असतो.आतापर्यत कथक , भरतनाट्यम , कुचीपुडी, ओडिसी, मणीपुरी, कथकली हे नृत्यप्रकार सादर झाले असुन यावर्षि भिलाई ( छत्तीसगड )येथील शर्मिष्ठा घोष, पलक उपाध्याय, गायत्री तिवारी हे भरतनाट्यम , कुचीपुडी , आणि मोहीनीअट्टम हे नृत्य प्रकार सादर करणार आहेत. तर नुपूर अॕकेडमी च्या विद्यार्थीनी कथक नृत्य सादर करतील. या महोत्सवात सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षांची रोपे सर्व उपस्थीत रसिकांना वितरित करण्यात येतील. कार्यक्रमास कुठलेही प्रवेश शुल्क नाही. तरी सर्व रसिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.
नृत्यश्री पुरस्कार
या महोत्सवांतर्गत अभिजात भारतिय नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या कलावंतांना नुपूर कथक डान्स अॕकेडमी भुसावळ तर्फे नृत्यश्री पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात येते. या वर्षी हा पुरस्कार पलक उपाध्याय, गायत्री तिवारी, शर्मिष्ठा घोष यांना जाहिर करण्यात येत आहे.