भुसावळ – अयोध्या नगर, मोहित नगर, श्रीनगर, भोई नगर, गणेश कॉलनी, गोदावरी नगर, अष्टविनायक कॉलनी, खळवाडी परिसरातील ग्राहकांना अतिरिक्त रक्कमेची वीज देयके महावितरण तर्फे देण्यात आली होती. महाराष्ट्र वीज हक्क संघटनेच्या प्रा. धीरज पाटील, विशाल ठोके, मिलिंद उंबरकर, अमोल पाटील, सुरज चौधरी, देवेश सपकाळे यांच्याकडे या ग्राहकांनी तक्रार मांडली होती.
कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्या नंतर अशोक गिरधर नारखेडे- 6810/-, वैशाली प्रकाश खडसे – 8350/- हेमराज ज्ञानदेव खडसे- 5440/-, सुमनबाई भागवत उंबरकर- 6700/-, विठठल तुकडू कोळी – 2480/-, जय मिस्त्री- 37,262.49/-, विजय सूर्यभान पाटील- 12620/-, संजय एकनाथ पाथरवट- 4877/- रुपये असे एकंदरीत 85 हजार रुपयांचा देयकाचा दिलासा मिळाला आहे.
ग्राहकांनी देयके तपासावे: प्रा.धीरज पाटील
ग्राहकांनी प्रत्येक महिन्यात येणारी देयके तपासली पाहिजे, सोबतच मीटर नंबर, मिटरवरील रिडींग ह्या सर्व बाबींवर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. परिसरातील ग्राहकांना वीज देयकांची समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे.



