भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व आनंदाने जयंती निमित्त येथील खडका रोड भागातील एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल येथे उत्साहात व आनदाने साजरी करण्यात आली . महिला शक्ती समाजसेवा महिला मंडळ आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले .
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात झाली .
यावेळी व्यासपीठावर शाळेचे संस्थापक अध्यक्ष मुन्ना इब्राहिम तेली , मुख्याध्यापक वाजिद सर ,
पाहुणे डॉ सुवर्णा गाडेकर, डॉ वंदना वाघचौरे, सौ आरती चौधरी, रेखा सोनवणे , राजश्री सुरवाडे , पत्रकार उज्वला बागुल, तसलिमा, सुनंदा खरे, मनीषा बाविस्कर , भारती म्हस्के , छाया , शिक्षिका अंजूम खान आदीं मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिला शक्ती समाजसेवा महिला मंडळतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध भावमुद्रा असलेले सुरेख चित्र रेखाटून चित्रांचे प्रदर्शन भरविले यावेळी विजेत्यां विद्यार्थ्याना महिला शक्ती समाजसेवा महिला मंडळ तर्फे पारितोषिक देवून मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले . तसेच आसिफ खान या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची व सय्यद मुजफ्फर या विद्यार्थिनीने माँ साहेब जिजामाता यांची वेशभूषा परिधान करून सजिव कलाकृति सादर करून उपस्थितांचे मन जिकले. तर मदिहा फातेमा आरिफ व अक्सा मो.उबेद या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे विचरांवर भाषण देऊन श्रोत्यांचे लक्ष वेधले .
शाळेचे अध्यक्ष हाजी मुन्ना
इब्राहिम तेली सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका आरमार योजना व राजकीय परिस्थिती यावर आपले मत
ब्यक्त केले. तर मुख्याध्यापक वाजिद सर यांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व व विचार आजही उत्साह व प्रेरणा देते यांवर मार्गदर्शन केले . तर आरती चौधरीं , डॉ वंदना वाघचौरे , डॉ. सुवर्णा गाडेकर, राजेश्री सुरवाडे यांचेसह मान्यवरानी मनोगत व्यक्त केले . महिला शक्ती समाजसेवा महिला मंडळ अध्यक्षा अंजूम
खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमासाठी
मुख्याध्यापक, शिक्षक वृंद ,कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका कविता सिद्धार्थ मेढे यांनी केले तर आभार शाळेचे उपशिक्षक
चंद्रशेखर भारंबे यांनी मानले.



