विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी त्वरित कोव्हॅक्सीन लस उपलब्ध करा – शिशिर जावळे यांचे आरोग्य मंत्र्याना साकडं :


भुसावळ – भुसावळ शहरा सह तालुक्यात 12 फेब्रुवारी पासून कोव्हॅक्सीन लसीचा साठा संपला आहे. एकीकडे इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही डोस सक्तीचे आहेत. मात्र डोस उपलब्ध नसल्याने भुसावळ शहर व तालुक्यातील जवळपास 15% म्हणजेच 1000 विद्यार्थ्यांचे लसीकरण रखडले आहे. भुसावळ तालुका आरोग्य विभागाने जळगाव जिल्हा प्रशासना कडे याबाबत मागणी केली आहे. मात्र अजूनही डोस उपलब्ध झाले नसल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक चिंतेत आहेत. एकीकडे 15000 कोविड शिल्ड चे150000 डोस उपलब्ध आहेत. मात्र शेकडो विद्यार्थ्यांनि कोव्हॅक्सीन लसींचे पहिला डोस घेतले असल्यामुळे त्यांना या कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्या शिवाय त्यांना बोर्ड परीक्षा देता येणार नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित सदर सर्व विद्यार्थ्याना कोव्हेक्सीन चा दुसरा डोस त्वरित उपलब्ध करून द्यावा अन्यथा परीक्षे साठी दोन डोस सक्ती त्वरित रद्द करावी अशा मागणीच पत्र सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे अध्यक्ष साई निर्मल फॉउंडेशन भुसावळ यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, डॉ. अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठवले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.