भुसावळ : समाजात वावरतांना दक्षता बाळगाणे गरजेचे असून त्या माध्यमातून अप्रिय घटना रोखता येतील शिवाय चिमुकल्या मुलींना चॉकलेट घेण्यासांठी कुणासोबतही पाठवू नये, असे आवाहन भुसावळातील न्या.डी.एम.शिंदे यांनी केले. तालुका विधी सेवा समिती, एन.टी.अॅन्टीरॅगींग कमेटी व कोटेचा महाविदयालयातर्फे मंगळवारी पोक्सो व लैंगिक अत्याचारविषयक कायद्याबाबत कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रसंगी लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनी सुजाता वाघोदे व नेहा जावरे उपस्थित होत्या तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीर, प्रा.एस.बी.नेतनराव व प्रा.माधुरी भुतडा उपस्थित होत्या.

प्रा.माधुरी भुतडा यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर सुजाता वाघोदे यांनी पोक्सो व लैंगिक अत्याचारासंबंधीत माहिती देत गुड टच व बॅड टचची माहिती दिली. न्या.शिंदे यांनी सुध्दा पोक्सो व लैंगिक अत्याचाराविषयक कायद्याबाबत माहिती दिली. डॉ.जे.व्ही.धनवीर, उपप्राचार्य यांनी विचार मांडले. प्रा.एस.बी.नेतनवार यांनी आभार मानले. सतीश पाटील व जगदीश मानकर यांनी सहकार्य केले.


