भुसावळातील हिस्ट्रीशिटर निखिल राजपूतला अटक उपनिरीक्षक हल्ला प्रकरण : आरोपी व कुटुंबांकडून पोलिसांवर आज पुन्हा हल्ला : तीघांविरुद्ध गुन्हा दाखल : डिवायएसपी वाघचौरे यांनी दिली माहीती :


भुसावळ- पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला केल्या प्रकरणी येथील फरार आरोपीस निखिल राजपूत याला बाजारपेठ पोलिसांनी १४ रोजी अटक केल्याची कारवाई केली असता निखिल व त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना प्रतिकार केला व तो गच्चीवरुन पळून जात असतांना पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत बाजारपेठ पोलिसात तीघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत, डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पत्रकारांना सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, पीएसआय महेश घायतड यांच्यावर २७ नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असतांना निखिल व त्याच्या ७ सहकार्‍यांनी घायतड यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याबाबत बाजारपेठ पोलिसात गु.र.नं.४६६/ २०२१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. घटनेपासून आरोपी व सहकारी फरार झाले होते. त्यापैकी पाच जणांना अटक केली आहे. त्यातील फरार तीघांपैकी मुख्य आरोपी निखिल हा १४ रोजी सकाळी ९ वाजता त्याच्या श्रीराम नगर भागातील दत्त नगरातील घरी आला असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पो.नि. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याच्या घरी सापळा रचला. त्यानंतर पोलिसांच्या सापळ्याची चाहुल लागताच निखिलने घराच्या गच्चीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पो.कॉ. दिनेश कापडणे, प्रशांत सोनार यांनी गच्चीवर चढून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी निखिलने व कुटुंबीयांनी पोलिसांना धक्काबुक्की करत प्रतिकार केला. असता पोलिसांनी त्याला पकडले व पोलिसांच्या वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला असता. त्याने वाहनातून जाण्यास विरोध केला. या झटापटीत पो.कॉ. प्रशांत सोनार हा जखमी झाले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात किशोरा महाजन यांच्या फिर्यादीवरुन निखिल राजपूत याच्यासह दोन महिला अशा तिघांविरुद्ध ९९/२०२२, भा.दं.वि. ३५३, ३३२, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई, डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राहुल गायकवाड, सपोनि. हरिष भोये, हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, राजेश पाटील, गणेश चौधरी, चालक सुनील सोनवणे, महिला पोलिस सीमा चौधरी, वनीता बाविस्कर, आशा बावस्कर, पो.ना. रमण सुरळकर, यासिन पिंजारी, निलेश चौधरी,पो.कॉ. सचिन पोळ, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे यांनी केली.
निखिलवर १६ गुन्हे
निखिल राजपूत याच्यावर बाजारपेठ पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे एकुण १६ गुन्हे दाखल आहे. यात जबरी चोरी, तलवारी बाळगणे, गंभीर दुखापत, आर्म ऍक्ट, घातक शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. शिवाय त्याच्यावर हद्दपारी व एमपीडीएनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या गुन्हेगारी वर्तनात कोणताही बदल दिसून आला नाही. तसेच १४ रोजी पोलिसांवर पुन्हा हल्ला केल्याबाबत त्याच्यावर गंभीर स्वरुपाची करवाई करण्यात येणार असल्याचे डिवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले.

नागरिकांनी तक्रारींसाठी पुढे यावे
दरम्यान, निखिल सह अन्य गुन्हेगारी प्रवृत्ती व टोळ्यांकडून शहरातील डॉक्टर्स, व्यापारी, लहान मोठे उद्योजक, कारखानदार, टोलनाका यासह ज्यांना आर्थिक स्वरुपाची मागणी होत असेल किंवा झाली असेल अशांनी न घाबरता पोलिस वा आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन करुन निश्‍चितच गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही डिवायएपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर :
आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शहरातील गुन्हे व गुन्हेगारीवर पोलिसांचे लक्ष असून कारवाईबाबत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी हे सुद्धा बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.