भुसावळ -शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजीत निखिल खडसे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत साकेगावच्या उन्नती इलेव्हन संघाने राज्यभरातून आलेल्या संघांना नमवत साकेगावच्याच तन्वी इलेव्हनचा अंतिम सामन्यात ७ गड्यांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदविले. सामन्याचा मानकरी उन्नती इलेव्हन संघाचा विलास पवार ठरला. सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामी निर्देशक मानव सोहेल ,माजी महसूल मंत्री एकनाथ नाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, यांच्या हस्ते विजयी संघाला ५१ हजार व चषक व उपविजयी संघाला३१ हजार व चषक देण्यात आले .मंचावर यावेळी जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन रोहिणी खडसे, माजी आमदार दिलीप भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, मुंबईचे उद्योगपती शेख सलीम, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. सुनील नेवे, आयोजक अनिकेत पाटील, राजू सूर्यवंशी, शेख शफि,सचिन चौधरी, बुटासिंग चितोडिया, युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, दिनेश नेमाडे ,पुरुषोत्तम नारखेडे, किशोर पाटील, देवा वाणी, संतोष त्रिंबक चौधरी, रवींद्र बाविस्कर, रवींद्र पाटील, योगेश चौधरी, नितीन धांडे ,योगेश पाटील,अरविंद वारके, मनोज महाजन उपस्थित होते.
रविवारचा दिवस असल्यामुळे भुसावळात गेल्या अनेक वर्षापासून बंद झालेले क्रिकेट सामने सुरू झाल्याने क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी मैदानाच्या चारी दिशेने खचाखच क्रिकेटप्रेमी उपस्थिती दिली होती ,पहिला सेमीफायनल तन्वी इलेव्हन साकेगाव विरुद्ध स्वराज इलेव्हन भुसावळ यांच्यात झाला हा सामना तन्वी इलेव्हन संघाने २८ धावांनी जिंकला, दुसरा सेमी फायनल अली स्टार भुसावळ विरुद्ध उन्नती इलेव्हन साकेगाव यांच्यात झाला हा सामना उन्नती इलेव्हन संघाने पाच गडी राखून जिंकला. अंतिम सामना साकेगाव च्या तनवी इलेव्हन व उन्नती इलेव्हन या दोन संघात झाला या दोन्ही संघांमध्ये साकेगाव सह औरंगाबाद चे सुद्धा खेळाडू होते अंतिम सामना उन्नती संघाने सात गडी राखत जिंकला. कॉमेंट्री -रमजान पटेल, फकृद्दिन शेख, स्कोरिंग -अफजलखान, बिपिन नायडू, ऑनलाइन स्कोरिंग -असलम शेख यांनी केली तर पंच म्हणून अरशद सैय्यद,नदीम शेख,साकेत तारे यांनी काम बघितले स्पर्धेचे बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन प्रकाश लोडते यांनी केले
विजयी संघाला आयोजकांकडून ५१ हजार व चषक, उपविजेत्या संघाला ३१ हजार व चषक, तृतीय संघ अलि स्वराजला २१ हजार व चषक याशिवाय पार्थ मोटर क्रिकेट संघाला उत्कृष्ट संघाचा ११ हजार व ट्रॉफीने गौरविण्यात आले.

मॅन आँफ द सिरीजचा मानकरी उन्नती संघाचा बाळू हिवाळे हा ठरला, स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज शाहरुख शेखला देण्यात आले ,उत्कृष्ट फलंदाज तौसीफ मिर्झा ,उत्कृष्ट विकेट किपर आतिफ शेख, बेस्ट फिल्डर मनोज पवारला देण्यात आले. दरम्यान राजू सूर्यवंशी यांनी सर्व संघांना वैयक्तिक रोख पुरस्कार दिले याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू नाही रोख पुरस्कार दिले. दरम्यान मंचावरील अनेक मान्यवरांनीही यावेळी रोख बक्षिसे दिली
आयोजन कमिटीतर्फे स्पर्धेसाठी परिश्रम घेतलेल्या विविध समित्या चे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
स्पर्धा यशस्वितेसाठी अनिकेत पाटील मित्र परिवार च्या सदस्यांनी प्रा. सुनील नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले .


