भुसावळात गोसेवकांचे पालकमंत्री यांना निवेदन :

भुसावळ – जखमी मुक़्या प्राण्यासाठी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थांना जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली . पालकमंत्री यांचे भुसावळ शहरात विकास काम उद्धाटन निमित्त आगमन झाले सर्व प्रथम पालकमंत्री यांनी एक सामान्य प्राणी मित्रांसाठी स्वतःची गाडी थांबवुन धावती भेट घेतली यावेळी प्राणी मित्रातफेॅ व गोसेवक परिवाराकडुन श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतीमा देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी मुक्या जखमी जीवांच्या सेवेसाठी व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणा-या विद्यार्थांसाठी भविष्यकाळात स्वतत्र दालन मिळावे अशी मागणी करण्यात आली . यावेळी रोहित महाले , प्रणव डोलारे, चेतन पवार , अनिकेत साळी , मयुर सावकारे व समस्त बांधव उपस्थित होते .
या मागणी करीता महाले अनवाणी पायानी दोन वर्षांपासुन प्रवास करत असून जखमी जीवांची सेवा निस्वाथीॅ भावनेने करत असतात एका फोनवर येऊन उपचार करतात असे पालकमंत्री यांना उपस्थितांनी सांगीतले असता त्यांनी रोहित महाले यांना कौतुकाची शाबासकी देवून चांगल्या कामासांठी सोबत आहोत असे सांगीतले.