भुसावळ – शहरातील सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत
४.३७ कोटी रुपयांचे कामे व वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १.८५ कोटी रुपये रुपयांचे अशी एकूण ६.२२ कोटी रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन १२ फेबुवारी, शनिवार रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांची उपस्थिती लाभणार आहे.
शहरातील श्रीनगर महादेव मंदिराजवळ, डी.एस. हायस्कूल,एच.डी.एफसी बँकेजवळ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे . सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ४.३७ कोटी रुपयांचे भूमिपूजन होणार आहे .
न.पा. हद्दीतील नाहाटा चौफुली,श्रीराम डेअरीपासून ते मोटुमल शोमराज चौकपर्यंत रस्त्यावर नवीन दुभाजक तयार करणे,सुशोभीकरण करणे खर्च ६२.७२ लक्ष.नपा हद्दीतील गांधी पुतळापासून ते जॉली पेट्रोल पंपपर्यंत सुशोभित करणे खर्च रुपये ६४.५५ लक्ष, न पा हद्दीतील गांधी पुतळा ते राहूननगर तापीनदी पुलापर्यंत रस्त्यावर नवीन दुभाजक तयार करणे खर्च रु.२८.६३ लक्ष. प्रभाग क्र. १९ मध्ये केळकर हॉस्पिटलमागील ओपन स्पेस पेव्हर ब्लॉक बसवीणे व सुशोभीकरण करणे खर्च रु. २५.३८ .प्रभाग क्र.७ मधील तुषार चिरमाडे यांचे घरापासून बाळू शिरोळे, अष्टविनायक कॉलनी इत्यादी ठिकाणी काँक्रीटीकरण करणे खर्च रु. रु.७०.६५ लक्ष . तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १.८५ कोटी रुपयांचे कामे होणार आहे .
यात न पा संचालित इमारत दयाराम शिवदास विद्यालयाचे नुतनीकरण स्टॉप व विद्याथ्यांसाठी २० सिटचे बांधकाम करणे खर्च रुपये ४१.६८ लक्ष . न पा संचालित इमारत दयाराम शिवदास विद्यालयाच्या इमारतीला खिडक्या, ग्रील दरवाजे, फ्लोरिंग, पत्रे रंगकाम करणे खर्च रुपये.४७.६६ लक्ष.न पा संचालित प्रशासकीय इमारत दयाराम शिवदास विद्यालय नुतनीकरण प्लेव्हर ब्लॉक काँक्रीटीकरण, दुरूस्ती व प्लॉस्टर करणे खर्च रु. ३७ लक्ष, न पा संचालित प्रशासकीय इमारत शिक्षण मंडळाचे शाळा क्रमांक १ चे नुतनीकरण व कंपाउंड वॉलचे इमारतीचे प्लॉस्टर पुफिंग, रंगकाम करणे खर्च ३५.७४ लक्ष रुपये असा एकुण ६.२२ कोटि रुपये विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे .
कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन
रामसिंग सुलाने प्रशासक न.पा. भुसावळ व संदीप चिद्रवार मुख्याधिकारी यांनी केले आहे.



