जळगाव जिल्हा मराठी भाषा समितीवर साहित्यिक डॉ.अ.फ.भालेराव यांची नियुक्ती


मुक्ताईनगर – मुक्ताईनगर येथील जेष्ठ साहित्यिक तथा कादंबरीकार डॉ.अ.फ.भालेराव यांची नियुक्ती डॉ.अभिजित राऊत (जिल्हाधिकारी जळगाव यांनी केली आहे.समितीचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राऊत सदस्य सचिव म्हणून शुभांगी भारदे (मराठी भाषा अधिकारी )आहेत.
डॉ.अ.फ.भालेराव यांच्या चार कादंबरी ,दोन कथा संग्रह दोन चरित्र दोन कविता संग्रह एक वैचारिक,धर्म ते धम्म या कादंबरीचे समिक्षा संपादन तर “धर्म ते धम्म या कादंबरीचा हिंदी अनुवाद प्रा.डॉ.सुरेश तायडे यांनी केला आहे.त्यांची आगामी शेतकरयांच्या जीवनावर आधारीत “फुलफनी “ही कादंबरी येत आहे.त्यांच्या साहित्यर अनेक प्राध्यापकसंशोधन करीत आहे.नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वचं स्तरातून अभिनंदन होत आहे.