मॉल मधे वाईन विक्री वर बंदी करण्यात यावी – जिल्हाधिका-यांना निवेदन:

जळगाव – महाराष्ट्र शासनाने मॉल मधे विक्री करण्यास परवानगी दिली आहे या निर्णया चे पुर्ण विचार करावा व हा निर्णय मागे घेण्यात यावा या विषया चे निवेदन रिद्धी जानवी फाउंडेशन च्या वतीने जिल्हाधिकारी ना देण्यात येत आहें.
मॉल मधे वाईन विक्री केल्याने महिला,युवती यांच्या अस्मिते ला धक्का पहुंचु शकतो व सामान्य माणसांच्या जीवनावर या गोष्टी चा चुकीचा परिणाम होऊन सामाजिक जीवन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहें. त्या मुळे राज्य शासनाने मॉल मधे वाईन विक्री करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन देतानां रिद्धी जानवी फाउंडेशन च्या चित्रलेखा मालपाणी, ज्योती तिवारी,रेखा चांडक, संगीता दायमा, उपस्थित होते.