भुसावळ – ऑर्डनन्स फॅक्टरी येथील नॅशनल बॅडमिंटन खेळाडू अशोक सी मोरे जे डब्ल्यू एम यांना नुकताच
26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या
बॅडमिंटन खेेळामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल लाइफ अचिव्हमेंटअवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक वसंत निमजे यांच्या हस्ते त्यांचा स्पोर्ट्स ब्लेझर व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला अशोक सी मोरे यांनी त्यांच्या सेवेत आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथून प्रतिनिधित्व केले आहे ऑडनस फॅक्टरी बोर्ड व राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटनमध्ये प्रदर्शन केले आहे त्यांना वर्ष 2010 मध्ये गुहाटी आसाम येथे झालेल्या सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2012 ऊटी येथे बॅडमिंटन चॅम्पियनशिप तसेच टीमच्या माध्यमातून 1998 ते 2018 पर्यंत 14 वेळेस इंटर इंन्टीटयुेंशनल टूर्नामेंट मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकत्ता तर्फे आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले आहे
अशोक सी मोरे यांनी ओपन सिंगल चॅम्पियनशिपमध्ये सहा वेळेस विजेता म्हणून पदक जिंकले आहेत
तसेच ओपन डबल्स मध्ये आठ वेळेस ऑल इंडिया लेव्हलवर पदक जिंकले आहेत
अशोक सी मोरे हे ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत या पुरस्कारा बद्दल सर्व कर्मचारी बंधू-भगिनी स्टाफ व अधिकारी त्यांचे अभिनंदन करत आहेत



