निरीक्षण व विचार करा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून संकल्पना समजून घ्या – डॉ. संजयभाई पंड्या :

वरणगाव – विज्ञान समजून घेण्यासाठी पाठांतर घोकंपट्टी ची गरज नाही परंतु आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना यामागे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी त्याचे निरीक्षण केले पाहिज त्यावर विचार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर ती भर दिल्यास आपल्याला घडणाऱ्या विविध वैज्ञानिक संकल्पनेचा कारणमीमांसा करता येऊ शकत असल्याचे प्रतिपादन गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील एम डी मेहता जिल्हा विज्ञान केंद्राचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजयभाई पंड्या यांनी हँड्स ऑन सायन्स या कार्यक्रमावेळी केले 

उषा नॅशनल रिसर्च सायन्स सेंटर च्या माध्यमातून इयत्ता सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळात ऑनलाइन सायंटिस्ट कोर्स सुरू करण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील तज्ञांशी हितगुज करून त्यांच्यासाठी प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविले जातात या कार्यक्रमाला रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रमौली जोशी, कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटरचे नॅशनल डायरेक्टर सुनील वानखेडे नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील नॅशनल परिसर सायन्स सेंटर भुसावळ चे अध्यक्ष जीवन महाजन रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष डॉ. संजू भटकर ए टी झांबरे विद्यालय जळगाव चे शिक्षक धीरज पाटील महात्मा गांधी विद्यालयाचे उपशिक्षक सतीश मोरे आदी उपस्थित होते

ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमात डॉ. संजयभाई पंड्या यांनी विद्यार्थ्यांना हँडस ऑन सायन्स अंतर्गत न्यूटनचा तिसरा नियम हवा पाणी आणि जमिनीवर कशा पद्धतीने लागू होतो याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवत दोन चुंबकात आकर्षण व प्रतीकर्षण असते धोनी निर्मितीसाठी कंपन व घर्षण ची आवश्यकता असते तसेच घरातील टाकाऊ वस्तु पासून विज्ञान कसे शिकू शकतो याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले

देशातील तज्ञांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

देशभरामध्ये विज्ञान व गणित क्षेत्रांमध्ये विविध तज्ञ काम करत आहे या तज्ज्ञा जवळ असलेले ज्ञान देशातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडवणे व गणित आणि विज्ञानाची चळवळ उभी करून सर्वसामान्यां मधील विज्ञानाची भीती दूर करण्याचे काम रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फौंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे यासाठी अनेक तज्ञ मदत करत असून एकाच वेळी देशभरामध्ये विविध अनेक ऑनलाईन मीटिंग च्या माध्यमातून मार्गदर्शनाचे काम केले जात आहे

डॉ. चंद्रमौली जोशी, अध्यक्ष रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात

विद्यार्थी जाणार स्पेस एक्जीबिशन सेंटर भेटीसाठी

देशभरामध्ये रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अध्यक्ष डॉ.चंद्रमौली जोशी यांच्या माध्यमातून विज्ञानाची जनजागृती होण्यासाठी शाळांमध्ये कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटर व विक्रम साराभाई इंनोवेशन सायन्स सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ऍक्टिव्हिटी करवून घेत त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे काम सुरू आहे अशा या विद्यार्थ्यांची लवकरच अहमदाबाद येथे विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर, विक्रम साराभाई स्पेस एक्जीबिशन सेंटर, आमदाबाद सायन्स सेंटर भेटीसाठी घेऊन जाणार आहेत यामुळे विद्यार्थ्यांना गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांसोबत चर्चा घडवून आणता येऊ शकते

सुनील वानखेडे नॅशनल डायरेक्टर कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटर