भुसावळ (प्रतिनिधी):-
भुसावळ तालुक्याची प्रहार जनशक्ती पार्टी ची शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यात किशोर हरी घुले (उपशिक्षक) यांची शिक्षक संघटना भुसावळ तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली याबाबतचे नियुक्ती पत्र उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पत्रकार हर्षल पाटील शिक्षक नवीन नेमाडे, रायसिंग पाटील,गजानन दांडगे , योगेश नेमाडे , गौरव भोळे ,श्री मनोज घुले तसेच जिल्ह्यातील,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका विविध क्षेत्रातील मान्यवराकडून घुले यांचे अभिनंदन व कौतुक केले.
शिक्षकांचे प्रश्न सोडवणार;- तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्ग यांचे खूप प्रश्न व अडचणी आहेत त्या प्रहार च्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेल तसेच आगामी काळात तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मेळावा नामदार बच्चूभाऊ कडू, प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे, तसेच माझे मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच घेण्यात येईल व प्रहार जनशक्ती शिक्षक संघटनेचे भुसावळ शहरात कार्यालयात उदघाटन करण्यात येईल असे किशोर घुले यानी सांगितले



