भुसावळ : जळगांव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक,समाज सेवक आणि शिक्षणप्रेमी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बी सी बियाणी तथा मामाजी यांची आठवी पुण्यतिथी बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये साजरी करण्यात आली.
शहरातील प्रतिथयश उद्योजक यांनी आपला व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत,बियाणी एज्युकेशन ग्रुप या शैक्षणिक संस्थेचे रोपटे लावले,या मागे भारतीय संस्कार आणि आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण भावी पिढीला मिळावे हा उदात्त हेतू होता.आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले दिसून येत आहे.
व्यवसाय,समाज सेवेची आवड आणि शिक्षण क्षेत्रावरील अपार प्रेम असणाऱ्या मामाजीची आठवी पुण्यतिथी बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये साजरी करण्यात आली.
प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रीमती कांताबाई बियाणी,संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी,उपाध्यक्ष विनोद बियाणी,संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, स्मिता बियाणी,उद्योजक रोनक बियाणी,खुशी बियाणी यांच्या हस्ते मामाजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
पुण्यतिथीच्या या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे,रजनी सावकारे तसेच भुसावळ नगरपालिकेचे
मुख्याधीकारी संदीप चिद्रवार , नगरसेवक युवराज लोणारी,पुरुषोत्तम नारखेडे,किरण कोलते,प्रा.सुनील नेवे,दीपक धांडे,महेंद्रसिंग ठाकूर,बोधराज चौधरी,अजय भोळे,रमेश मकासरे,लक्ष्मी मकासरे,परिक्षित बर्हाटे,रमाकांत दुबे,दिनेश जोगदंड,पंचायत समिती माजी सभापती सुनील महाजन,भालचंद्र पाटील,पप्पू बारसे,गोपाल तिवारी,प्रल्हाद फालक,अँड निर्मल दायमा, किशोर पाटील,माहेश्वरी समाज तालुका अध्यक्ष प्रवीण भराडिया,माहेश्वरी समाज अध्यक्ष रामबल्लभ झवर,अॅड प्रवीण गामट,सीए पंकज झवर,राजेश चौधरी,राजीव पारिख,राजेश लढा,गोपी हेडा,गोविंद हेडा,सर्वेश लाहोटी,संजय लाहोटी,आर के पाटील, गोपाल ठाकूर,श्याम अग्रवाल,सचिन अग्रवाल,योगेश मांडे,मनोज माहेश्वरी,प्राचार्य डॉ.कांचन जोशी,शुक्ला सर,विनोद पाठक,बियाणी एज्युकेशन ग्रुप च्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी सह शैक्षणिक,सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील मंडळी ही उपस्थित होती.याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डी एम पाटील यांनी पूज्य मामाजी यांच्या स्मृतीस उजाळा दिला.




