बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत गावठी कट्टयासह तिघांना अटक :

भुसावळ – बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना सोमवार रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती की बाजारपेठ हद्दीतील तुषार किशोर खरारे,कमलेश किशोर खरारे, विजय संजय निकम हे वांजोळा रोड परिसरात देशी कट्टा सह धुमाकूळ घालत आहे परिसरातील नागरिकांना धमकावत आहे दुपारी सुद्धा कट्टा हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाल्यावरून तिघांवर कारवाई करण्यात आली आहे .
तिघांकडून एक देशी कट्टा हस्तगत करण्यात आला असून जप्त करण्यात आला आहे. यामधील तुषार खरारे यावर यापूर्वीदेखील दरोडा सारखा गुन्हा दाखल आहे. बाजारपेठ पोलिस स्टेशनला आर्म अँक्ट कलम 3/25,725, 625, भा.द.वि.कलम 401,400 खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन करीत असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.