भुसावळात चोरांचां सुळसुळाट जुन्या एमआयडीसीत लाखोंची चोरी : .
भुसावळ – शहरातील वरणगाव रोडवरील जुनी एमआयडीसी मध्ये रात्री वायर बनविणाऱ्या कंपनीमध्ये चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून पाच लाखाचा कॉपर चोरी केल्याची घटना आज २० रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 29/01/2022 रोजी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी जय केबल अँड इंडस्ट्रीज या कंपनीचे कुलूप तोडून तसेच दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडून खिडकीमधून कंपनीच्या आत प्रवेश करुन रॉ मटेरियल अंदाजे पाच लाखाचे कॉपर व रोख रक्कम 25000 रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये खळबळ माजली आहे. सकाळी नऊ वाजेला कंपनी मालक गुरुमुख नरेश कुमार आठवणी एक कंपनी मध्ये आले असता यांना सर्व कुलपे तोडलेली दिसून आल्याने त्यांनी त्वरित बाजारपेठ पोलिस स्टेशनला घटनेबाबत माहिती दिली काही वेळातच बाजारपेठ पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोध घेत आहे. यापूर्वी या कंपनीमध्ये दोन वेळा चोरी झाल्याची घटना कंपनी मालकांनी सांगितले
सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सपोनि हरिष भोये,पोलीस उप निरीक्षक महेश घायतड,ए पी. आय.शांताराम महाजन,स.फौ.शरीफ काझी,आयाज सैय्यद नेव्हिल बाटली प्रशांत परदेशी प्रशांत सोनार उमाकांत पाटील जावेद शहा अशांनी भेट दिली.
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत आठवडाभरातील ही दुसरी चोरी असून शिरपूर कन्हाळा येथे भरदिवसा सिनेस्टाइल चोरी झाली होती याचोरीचा अद्याप पावेतो कोणताही तपास नाहीत्यात आज पुन्हा जुनी एमआयडीसीमध्ये पाच लाखाची चोरी झाल्याची घटना घडली आहे
या घटनेमुळे शहर परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे .


