:
भुसावळ – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सव व
26 जानेवारी गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारच्या आदेशानुसार ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे फॅक्टरीतील उत्पादित वस्तुंचे प्रदर्शनाचे उद्घाटन महाप्रबंधक
वसंत निमजे यांचे हस्ते फीत कापून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले .
या प्रसंगी महाप्रबंधक यांनी संबोधन पर भाषणात सांगितले की ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मधील दारू गोळ्याचे पॅकिंग उत्पादन हे देशाच्या इतर संरक्षण क्षेत्रातील फॅक्टरीला दिले जातात व त्यात दारूगोळा भरून भारतीय सेनेला त्याचा पुरवठा होतो . असे सांगून फॅक्टरीत उत्पादित होणाऱ्या उत्पादना बद्दल सविस्तर व महत्वपूर्ण माहीती दिली .
यावेळी श्री निमजे यांनी सर्वांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देऊन
बुधवार, 26 व गुरुवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर उत्पादन प्रदर्शन सर्वांसाठी निशुल्क खुले असून भुसावळसह जळगाव जिल्ह्यामधील सर्व नागरिक तसेच उद्योजकांनी भेट देवून पाहणी करावी
नागरीकांनी व प्रतिष्ठित उद्योजकांनी जास्तीत-जास्त संख्येने या उत्पादन प्रदर्शनीचा कोरोना नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन महाप्रबंधक वसंत निमजे यांनी केले .
सदर प्रदर्शनी ही कम्युनिटी हॉल , आयुध निर्माणी इस्टेट, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रसंगी ऑर्डनन्स फॅक्टरी मधील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी कार्यसमिति सदस्य जे.सी.एम.थ्री व फोर्थ चे सदस्य उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
याप्रसंगी दीपशिका महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती वैजयंती निमजे व त्यांची सर्व कार्यकारणी शिक्षकवृंद सर्वांनी प्रदर्शनीला भेट दिली.



