भुसावळ प्रतिनिधी -भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. या आजच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ. एम. व्ही. वायकोळे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आकर्षण केंद्र म्हणजे प्रमुख वक्ते प्रा.डॉ. उमेश उदापुरे, लॉ कॉलेज गोंदिया यांची उपस्थिती लाभली.तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. एस .व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. बि.एच. बह्राटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ. एन.ई भंगाळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख व रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, डॉ.डी.एम. टेकाडे, रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ममताबेन पाटील, रासेयोचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ विलास महिरे व प्रा.डॉ.बि. के. बानाईत यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.एस. नाडेकर, यांनी केले व 'राष्ट्रीय मतदान दिनाची प्रतिज्ञा' सर्वांन कडुन घेतली.
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.”
आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण केंद्र व प्रमुख वक्ते डॉ. उमेश उदापूरे यांनी मतदानाचे उद्दिष्टे व त्या अधिकाराची जबाबदारीने वापर करण्याची भूमिका स्पष्ट केली. म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे महत्वाच्या आहे. राष्ट्रीय मतदान दिन साजरा करताना आपण सर्वांकडून दुसरी शपथ करवून घेतली पाहिजे की आम्ही स्वतः मतदान तर करूच आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करू. आपण आपल्या लोकशाही सत्तेचा पुरेपूर वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्या संविधान मूल्यांचे पालन केले गेले जाईल. तसेच डॉ.उमेश उदापुरे यांनी अमेरिकेच्या मताधिकार पासून ते भारताच्या मताधिकार पर्यंत सविस्तर इतिहास मांडला. भारतीय संविधानिक अधिकारांचा संदर्भ घेत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय दृष्टीने जनजागृती होणे गरजेचे आहे जेणेकरून अधिकारांचा पुरेपूर वापर करून मताधिकार तरुण वर्ग जबाबदारीने वापरेल. अशा विविध अंगाने त्यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
अध्यक्षीय मनोगतात माननीय प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “की लोकशाही मजबूत ,विस्तृत आणि व्यापक करण्यासाठी आपण लोकशाही मूल्ये जपली पाहिजे.” सामाजिक विकास घडवायचा असेल तर मतदान हे जबाबदारीने केले गेले पाहिजे, असे प्रबोधनपर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भूपेंद्र बानाईत यांनी केले, वक्त्यांचा परिचय डॉ. डी. एम. टेकाडे यांनी केला व प्रा.डॉ. ममताबेन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम प्रसंगी रासेयोचे व राज्यशास्त्र विभागाचे विविध स्वयंसेवक कल्याणी पराळे, गायत्री बजाज, वैष्णवी ठाकूर, संजना दुधानी ,जयश्री पाटील, आदित्य हिवारे, स्वप्निल डोळसे, आकांशा चांदेकर ,तारकेश्वरी सोनवणे, सागर सोनवणे, हर्षल चव्हाण, गोपाळ रंदाळे, चेतना पाटील, निकिता बोरसे ,अमोल सुरडकर, इत्यादी. यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य बी. एच. बऱ्हाटे, व डॉ. एन. इ. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.


