भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव व 26 जानेवारी गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने बुधवार, 26 व गुरुवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भव्य उत्पादन प्रदर्शन लावण्यात येणार आहे. प्रदर्शनी ही कम्युनिटी हॉल , आयुध निर्माणी इस्टेट, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदर्शनात प्रवेश हा सर्वांसाठी निशुल्क असून नागरीकांनी व प्रतिष्ठित उद्योजकांनी जास्तीत-जास्त संख्येने या उत्पादन प्रदर्शनीचा कोरोना नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन महाप्रबंधक वसंत निमजे यांनी केले आहे.



