भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयच्या मराठी विभाग तर्फे आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘अंतर्गत ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली . प्रथम सत्रात प्रा. डॉ. राजीव यशवंते यांनी ‘मराठी भाषा सद्यस्थिती व वास्तव ‘ या विषयावर पहिले पुष्प गुंफले .मराठी भाषेची अस्मिता वअभिमान बाळगणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी व्याख्यानातून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष- उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी.गोस्वामी यांनी मराठी भाषेचे जतन व संवर्धन शासन पातळीवर होणे आवश्यक असल्याचे अध्यक्षीय भाषणतून सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. जे एफ. पाटील यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. दिनानाथ पाठक यांनी केले आभार प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत प्रा.डॉ. संदिप माळी यांनी ‘मराठी भाषेतील करीयरच्या संधी’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. आपल्या व्याख्यानात त्यांनी मराठी विषय घेऊन आपण विविध क्षेत्रात रोजगाराच्या वाटा उपलब्ध करू शकत असल्याचे सांगितले. तसेच प्राचार्य प्रा डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे यांनी मनोगतात मराठी भाषेतील साहित्य कसदार असल्याचे कथन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई. भंगाळे यांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांनी ओव्यांमधून मराठी भाषा समृद्ध केल्याचे सांगितले कार्यकमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. के.के अहिरे यांनी केले . सूत्रसंचलन प्रा. भारती सोनवणे यांनी केले. आभार प्रा वंदना महाजन यांनी मानले.
तिसऱ्या सत्रात कवयित्री शितल पाटील यांनी ‘जाऊ कवितेच्या गावा ‘या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. त्यांनी खानदेशाला काव्याची सामाजिक व सांस्कृतिक वाड्मयीन परंपरा लाभली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . के. के अहिरे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ . बी.एच बऱ्हाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून हरिवंशरॉय बच्चन यांच्या कवितेवर प्रकाश टाकला. सुत्रसंचलन प्रा. वंदना महाजन यांनी केले. आभार प्रा. भारती सोनवणे यांनी मानले.
चतुर्थ सत्रात प्रा .गणेश सुर्यवंशी यांनी मुद्रितशोधन या विषयावर चौथे पुष्प गुंफले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी मुद्रितशोधन कसे करावे व त्याच्या खुणा कोणत्या आहेत हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . के . के . अहिरे यांनी केले .कार्यकमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा डॉ. एस व्ही. पाटील यांनी मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज असल्याचे भाषणातून सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा . डॉ. स्वाती महाजन यांनी केले . तर आभार प्रा गौतम भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमाला मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले . सदर कार्यक्रमाला ऑनलाईन प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.



