साकेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या जयश्री पाटील यांचा दणदणीत विजय तर राष्ट्रवादीचा दारून पराभव


भुसावळ – साकेगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जयश्री जितेंद्र पाटील यांनी 660 पैकी 357 मतांची आघाडी घेऊन राष्ट्रवादीच्या हर्षालीका जितेंद्र पाटील( मते २९५) यांचा पराभव केलेला आहे
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हायुवक अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांना पुनश्च एकदा पराभव पत्करावा लागला आहे
ग्रामपंचायत सदस्य मथुराबाई पाटील यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान असलेले माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या सुनबाई जयश्री पाटील यांच्या निवडीनंतर आमदार संजय सावकारे यांनी दूरध्वनीद्वारे तर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी विजयी उमेदवार व साकेगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच पदाधिकारी यांचे अभिनंदन केले विजय प्राप्त करून देण्यासाठी विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयचे चेअरमन दिलीपसिंग पाटील उपसरपंच आनंद ठाकरे सरपंच पती विष्णू सोनवणे भारतीय जनता पार्टीचे तालुका युवा उपाध्यक्ष स्वप्निल सपकाळे, नारायण दादा कोळी, दिगंबर दादा पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोळी
पप्पू राजपूत गणेश कोळी, गजानन पवार सागर सोनवाल, कुंदन कोळी अशोक कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य लोकेश कुरकुरे सह सामाजिक कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेऊन ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत धनशक्ती विरोधात जनशक्तीने विजय प्राप्त केला आहे या निवडणुकीमुळे गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदेमध्ये होईल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत
तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरसाट रावसाहेब यांनी काम पाहिले तसेच चोक बंदोबस्तासाठी भुसावळ तालुका पोलीस प्रशासनाने अथक परिश्रम घेतले