बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा झंझावात , 9 जागांवर भगवा फडकला ; माजी मंत्री एकनाथराव खडसे व एडव्होकेट रविन्द्र पाटील यांना जोरदार धक्का ;

बोदवड- नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणी झाली असून यात शिवसेनेला 9 राष्ट्रवादीला 7 व भाजपला केवळ 1 जागा मिळाली आहे
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सलग 40 वर्षे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे खडसेंच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. पण त्यात त्यांना अपयश आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत वर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात बोदवड नगरपंचायत आहे.

खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदार संघात या नगरपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी ताकद लावली होती.तर शिवसेना नेते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकात पाटील यांनीही जोरदार प्रचार केला होता.

यात एकनाथ खडसेंना धक्‍का बसला असून राष्ट्रवादीला 7, शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला आतपर्यंत एका ठिकाणी विजय मिळाला आहे.
शिवसेना आणि भाजपची छुपी युती –
शिवसेना आणि भाजपच्या छुप्या युतीमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. एकनाथ खडसे यांना या निकालाने मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने मात्र बाजी मारल्यामुळे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटिल यांचा बालेकिल्ला अधिकच मजबूत झाला आहे. तर भाजपचे गिरीश महाजन यांनाही धक्का बसला आहे.