भुसावळ – तालुक्यातील ग्राम पंचायत दर्यापूर येथील भ्रष्ट्राचार बाबत तक्रार अर्ज संजय त्रिलोकनाथ खन्ना सामाजिक कार्यकर्ता, साईबाबा नगर दर्यापूर शिवार ,ऑडनन्स फॅक्टरी वरणगाव यांनी दिला असून संजय खन्ना यांना चौकशी अहवाल गट विकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ यांच्याकडून प्राप्त झाला असून ग्राम पंचायत दर्यापूर येथील भ्रष्ट्राचार उघड झाल्यानें संजय खन्ना यांना न्याय मिळाला आहे.

अधिक माहिती अशी की, ग्राम पंचायत मालमत्ता क्रमांक 355 चे मालकाचे नाव रकान्यात ज्योती गुलाबसिंग ठाकूर यांचे नाव लावतांना केलेली फेर फार नोंद ही मूळ खातेदार गुलाबसिंग जयकरणसिंग ठाकूर यांचा मयतीचा दाखला नसतांना तसेच कोणतीही वारस दाखला नसतांना व ग्राम पंचायतीचा कोणताही ठराव नसतांना केलेली असल्याचे दिसून येते.
त्यामुळे सदर नोंद करतांना अनियमितता झाली असल्याचे दिसून येते.त्यामुळे सदर नोंद नमुना नंबर 8 ला झालेल्या सण 2016 -17 ते 2019-20 या कालावधी मध्ये कार्यरत दिलीप रतन बारेला ग्रामविकास अधिकारी,आनंद फत्रू सुरवाडे ग्रामसेवक ,धनालाल भिला वाडीले ग्रामसेवक हे ग्रामविकास अधिकारी हे यास जबाबदार आहेत.तसेच सदर मालमत्ता क्रमांक 355 चे मालकाचे नाव रकान्यात विमल बाबुराव चौधरी यांचे नाव लावतांना केलेली फेर फार नोंद ही अर्जदार यांचे अर्जावर तारीख व स्वाक्षरी नसतांना देखील ग्रामपंचायतीचा ठराव करून फेर फार नोंद करण्यात आलेली आहे.तसेच सदर मालमत्ता ज्योती गुलाबसिंग ठाकूर यांनी विमल बाबुराव चौधरी यांना खरेदी करून देते वेळी खरेदी खतात पण क्रमांक 6 वर मालमत्तेचे 31 वर्षांपूर्वीचे जुने आर.सी.सी.बांधीव क्षेत्र 92 .20 चौ.मी.व उर्वरित बखळ जागेचे क्षेत्र 47.30 चौ.मी.असल्याचे नमूद केलेले आहे.
तसेच याबाबत ग्रामविकास अधिकारी ग्राम पंचायत दर्यापूर तालुका भुसावळ यांनी देखील दिनांक 09/10/2018 रोजीच्या दाखल्यात सदर मालमत्तेचे बांधकाम हे 31 वर्षापूर्वीचे असल्याचे नमूद केलेले आहे.परंतु ग्राम पंचायतीचे मालमत्ता रजिस्टर नमुना नंबर 8 मधील नोंदीनुसार सदर मालमत्तेचे बांधकाम हे सन 2003-2004 ते 2008-09 मध्ये झाले असल्याचे दिसून येते.त्यामुळे सदर मालमत्तेचे बांधकाम नेमके केव्हा झाले याचा बोध होत नाही व ग्राम पंचायतीचे मालमत्ता रजिस्टर नमुना 8 मधील नोंदी व खरेदी खतातील नोंदी तसेच ग्राम विकास अधिकारी यांचे दाखल्यातील नोंद यामध्ये मोठी तफावत असल्याचा चौकशी अहवाल गट विकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ यांनी संजय त्रिलोकनाथ खन्ना सामाजिक कार्यकर्ता, साईबाबा नगर दर्यापूर शिवार ,ऑडन्स फॅक्टरी वरणगांव तालुका भुसावळ यांनी ग्राम पंचायत दर्यापूर येथील भ्रष्ट्राचार बाबत तक्रार अर्ज 23/11/2021 रोजी दिला होता.या तक्रार अर्जाचा चौकशी अहवाल उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत जिल्ह्या परिषद जळगांव यांना दिनांक 27/12/2021 रोजी सादर केला होता.या तक्रारीची चौकशी प्रामाणिक पणे करून सामाजिक कार्यकर्ते संजय त्रिलोकनाथ खन्ना यांना न्याय दिल्याने आभार मानले आहे.


