सक्तीचे लसीकरण थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने :

जळगाव (तुषार वाघुळदे ) – कोविड शिष्टाचार रद्द करणे, लसीकरणातून अपंगत्व आलेल्यांना शासनाने नुकसान भरपाई देणे आणि साथ व आपत्ती व्यवस्थापन कायदे मागे घेण्याची आग्रहाची मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार 17 जानेवारी रोजी निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे यांनी घेतलेली आहे. त्यांच्या या आवाहनाला अनुसरूनच येथे हे अभिनव आंदोलन लोकशाही पद्धतीने करण्यात येऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर Iदेशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. सक्तीचे लसीकरण थांबवा. लसीकरणामुळे अपंगत्व आलेल्यांना शासकीय मदत मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। लस न घेतलेल्यांना विविध ठिकाणी प्रवेश न देणे तातडीने थांबवा विविध निर्बंध दूर करा अशा फलकांसह घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनेकांनी ही भूमिका समजून घेतली. यावेळी रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, युवक महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे, मुकेश सपकाळे, अभय मेघे, प्रदीप बनसोडे, अविनाश पारधे, रवींद्र पाटील, पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार किशोर लोहार, योगेश सुने, परशुराम पाटील, संदीप बारी, भगवान माळी आदी सहभागी झाले होते.