भुसावळ – येथील शिवसेनेच्या वतीने शिवसेना विभागीय कार्यालय जुना सातारा येथे माजी नगरसेवक दीपक धांडे आणि माजी नगरसेविका शारदा धांडे यांच्यावतीने २४२ आरोग्य कार्ड, ११० श्रम कार्ड, ६३ युनिव्हर्सल पासचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, अॅड. निर्मल दायमा, माजी नगरसेवक अॅड. नरेंद्र लोखंडे, पिंटू भोई, अमोल पाटील उपस्थित होते.
समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मजूर वर्गाच्या व अंत्योदय घटकाच्या उत्थानासाठी8 सरकारने राबविलेल्या उपक्रमाअंतर्गत ई-श्रम ही योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहायता, लाभार्थ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ, कोणत्याही कामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी सहायता, घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, वीज बिल सबसिडी, उपचारासाठी चिकित्सा रक्कम असे अनेक फायदे मजूर मार्गाला होणार आहेत. जन आरोग्य योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड मिळाले आहेत त्यांना आरोग्याच्या कोणत्याही समस्ये संदर्भात ५ लाखाचा मोफत आरोग्य विमा प्रती वर्ष मिळणार आहेत. युनिव्हर्सल पास असणाऱ्यांना प्रवास करता येईल अशी माहिती दीपक धांडे यांनी यावेळी दिली.



