प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करा : जळगावातील जावेद हबीब यांचे दुकान बंद करावे : भुसावळातील राजश्री नेवे यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी –


भुसावळ : प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी एका सेमिनारमध्ये महिलेच्या डोक्यात थुंकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टिकेचा भडीमार सुरू झाला होता. हा प्रकार म्हणजे समस्त महिलावर्गाचा अपमान असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी भुसावळातील सखी श्रावणी महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांनी अ‍ॅड.सुनीता खंडाळे-साळशिंगीकर यांच्या माध्यमातून स्थानिक पोलिस प्रशासन व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
युट्यूब द्वारे वा तत्सम सोशल
मीडिया द्वारे एक विडिओ समोर आला असून त्यात प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब यांनी ३ जानेवारी
२०२२ रोजी मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश येथे घेतलेल्या सेमिनार मध्ये एका महिलेच्या डोक्यावर
धुंकून तिची मानहानी केली. तसेच त्या महिलेची मानहानी होईल अशा प्रकारचे केस घाण आहेत .
शांपु नाहीये अस वक्तव्य केल आहे. जावेद हबिब यांची कृती ही अत्यंत किळसवाणी असून
त्यांनी जाणून बुजून समस्त महिला वर्गाचा अपमान या द्वारे केला आहे.
पाणी नसेल तरी अशा प्रकारे धुंकीने केसांची रचना करू शकतात. सारे जग हे कोरोंनाच्या
प्रभावात आहे, अनेक लोक त्यामुळे मृत्युमुखी पडले असताना, या रोगावर कोणतेही
औषध नसताना फक्त सामाजिक अंतर राखून, मास्क वापरुन व सेनीटायजर वापरुन आपण
सगळे त्याला दूर करू पाहत आहोत मात्र अश्या परिस्थितीत, अशा प्रकारे खुल्या कार्यक्रमात महिलेच्या डोक्यावर धुकुन अनेकांचा जीव
धोक्यात घालण्याचा गुन्हा जावेद अख्तर यांनी केला.
जावेद अख्तर हे जावेद हबिब हेअरअँड ब्युटी स्टुडिओ प्रा. ली. या नावाने कंपनी चालवीत असून त्यामध्ये त्यांची पत्नी
शाहीन अख्तर व अन्य ४ संचालक असून अशा प्रकारे गैर कृत्य करून सवंग प्रसिद्धी
मिळवून आपला व्यवसाय वाढवून त्याद्वारे पैसे कमविण्याचे काम हे करीत आहेत. या
कंपनी चे सर्व संचालक या साथी जवाबदार आहे .
जावेद हबीब यांचे
दुकान क्रमांक १०-११, क्रीम सेंटर, शॉपिंग कॉम्प्लेक्स गणपती नगर जळगाव -४२५००२
जळगाव येथे सलून आहे . तसेच त्यांचे रजिस्टरर्ड ऑफिस १ ला मजला निंबस सेंटर,
ओबेरॉय कॉम्प्लेक्स ,ऑफ न्यू लिंक रोड, सब टीव्ही रोड, अंधेरी पश्चिम -४०००५३ येथे7
आहे. जावेद हबीब या व्यक्तीचे खरे रूप व महिलां बद्द्लचे मत या प्रकरणातून समोर आले
आहे. कुठल्याही प्रकारचा आदर त्यांना महिलांबद्दल नाही हे दिसून येत आहे. तरी जळगाव येथे
त्यांचे सलून असून त्या सलून मध्ये महिलांचा अपमान व मानहानी करत असण्याची शक्यता
नाकारता येत नाही.
तरी या प्रकरणात योग्य ते लक्ष घालून कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वजा मागणी जावेद हबीबयांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांचे जळगाव येथे असलेले सलून देखील
तात्काळ बंद करण्यात यावे ही अशिलाच्या वतीने एडव्होकेट सुनीता खंडाळे साळशिंगीकर यांनी अर्जाद्वारे पोलिस अधीक्षक यांना दिले प्रत रवाना ,
पोलिस निरीक्षक, बाजारपेठ पोलिस स्टेशन, भुसावळ.
मा. प्रांत अधिकारी, भुसावळ.
पोलिस निरीक्षक, वर्सेवा पोलिस स्टेशन, अंधेरी, मुंबई.यांना रवाना केले .