भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्स ह्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये काम सुरू …..


भुसावळ -भारत सरकार आणि अखिल भारतीय तंत्रशास्त्र परिषद नवी दिल्ली यांनी स्वयंचलित हवाई यंत्रणा अर्थात ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्स ह्या क्षेत्रांना शैक्षणिक, तांत्रिक आणि औद्योगिकदृष्ट्या उदयोन्मुख क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगानेच भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अक्षय जोशी, मोहित चौधरी आणि विरेन्द्रसिंह खंडाळे यांनी पुढाकार घेत टील्टास सिस्टम्स या नावाने स्टार्टअप स्थापन करून स्वयंचलित हवाई यंत्रणा अर्थात ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्स ह्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महाविद्यालयच्या सहकार्यातून काम सुरू केले आहे.
स्वयंचलित हवाई यंत्रणा अर्थात ड्रोन तंत्रज्ञानाचा अभ्यास, संशोधन, ड्रोन निर्मिती, प्रशिक्षण आणि व्यावसायिक पुरवठा अश्या वेगवेगळ्या पातळ्यांवर महाविद्यालयाच्या सहकार्यातून टील्टास सिस्टम्स भरारी घेत आहे. विशेष म्हणजे टील्टास सिस्टम्सतर्फे नऊ विद्यार्थ्यांना नुकतेच स्वयंचलित हवाई यंत्रणा अर्थात ड्रोन तंत्रज्ञानाच्या उपयोगिता आणि उपयोजिता यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सादर प्रशिक्षणार्थींना अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, आणि प्रशिक्षक विरेन्द्रसिंह खंडाळे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. धिरज बेहरानी, सौरभ चौधरी, अभय माहिरे, निशांत भंगाळे, चेतन नंदगवळी, लविश ओजवल,गौतम नायर, केशव बोंडे आणि अनस शाह यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
देशात आणि जगात फक्त फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीच नाही तर लष्कर, पोलिस यंत्रणा, रेल्वे, खाण उद्योग, शेती तसेच पुरवठा आणि दळणवळण, सार्वजनिक बांधकाम, रस्ते निर्माण, सर्वेक्षण, मॅपिंग, डेटा अॅणनालिसिस, ऑनलाइन डिलिव्हरी, आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवणे ह्या प्रत्येकच क्षेत्रात ड्रोन चा वापर आणि वावर वाढणार असून, ह्या उदयोन्मुख क्षेत्रातील अधिकाधिक संधींचा लाभ घेण्याच्या महाविद्यालयाचा प्रयत्न असल्याचे अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी सागीतले.
बीआयएस रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार ड्रोन क्षेत्राची भारतातील उलाढाल ६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे आणि येणार्याा काळात दृष्टीच्या टप्प्यापलीकडील अंतरावर म्हणजेच दृष्यमानतेहून अधिक अंतरावरील कार्य करण्यासाठी लष्करी वापरापेक्षा स्वयंचलित ड्रोनचा शेती आणि व्यावसायिक वापर वाढणार असून शैक्षणिक, तांत्रिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रचंड संधि ह्या क्षेत्रात निर्माण होणार असल्याचे आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रा. जितेंद्र चौधरी, प्रा. नितिन खंडारे तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले. हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव श्रीमती एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कौतूक केले.