ग स सोसायटी निवडणुकीच्या मतदानासाठी पाचशे रुपयाचे शेअर्स आवश्यक योगेश इंगळे ,


भुसावळ – ग स सोसायटीची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे या निवडणुकीसाठी सभासदांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सभासदाचे कमीत कमी पाचशे रुपये चे शेअर्स असणे आवश्यक आहे असा नवीन नियम या निवडणुकीत आलेला आहे, हे शेअर्स आपले आहेत किंवा नाही याची खात्री करून घेण्याचे आवाहन ग स सोसायटी चे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे यांनी केले आहे

जिल्ह्यातील सर्वात मोठी गस सोसायटी असून या सोसायटीचे 36 हजारापेक्षा जास्त सभासद आहे या सोसायटीची निवडणूक येत्या काही दिवसात होऊ घातलेली आहे त्यादृष्टीने नियोजन सुरू असून मतदार यादी तयार करण्याचे काम शाखा स्तरावर सुरू असून एक नोव्हेंबर 2019 पूर्वी सभासद झाले आहेत अशा सभासदांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे परंतु त्या सभासदाचे सोसायटीमध्ये कमीत कमी पाचशे रुपयांचे शेअर्स असणे आवश्यक आहे तरी सभासदांनी सोमवार पर्यंत,आपल्या शाखेची मतदार यादी गस च्या मुख्य शाखेवर जमा होणे अगोदर आपल्या शाखेत जाऊन शेअर्स कमी असतील तर रोखीने पैसे भरून होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन सोसायटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे