भुसावळ – 31 डिसेंबर रात्री 9 वाजेला भुसावळ शहरांमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती तसेच पेट्रोलिंग पथके सुद्धा नेमण्यात आहे हायवे रोडवरील धाबे हॉटेल्स चेक करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात होते
भुसावळ शहरात नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन क़ायदा प्रमाणे 172 केसेस करण्यात येवून एकुण 78 ,350 रुपये दंड वसुल करण्यात आला .
या नाकाबंदी मध्ये विना मास्क फिरणाऱ्या 103 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच 18,340/- रुपये दंड वसूल करण्यात आला . ड्रंक अ्ँण्ड ड्राईव्हच्या 11 केसेस करण्यात आल्या असून वैद्यकीय तपासणी करून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे . नशा करून वाहने चालवीणाऱ्या विरुद्ध मोटर व्हीकल ॲक्ट प्रमाणे कारवाई
करण्यात आली विनाकारण काम वगळता फिरत असणाऱ्या विरुद्ध कारवाई केली
नवीन वर्षानिमित्त शासनाच्या नवीन गाईड लाईन प्राप्त झाल्या त्यानुसार कारवाई करण्यात आली तर विनाकारण फिरणाऱ्यांवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली तसेच ज्या काही अस्थापना / दुकानें वेळे व्यतिरिक्त उघडी होती त्या 8 दुकानांवर, नियमांचे पालन न केल्यामुळे दंडात्मक कारवाई. करण्यात 8 दुकानांवर, नियमांचे पालन न केल्यामुळे दंडात्मक कारवाई.
रात्री 9 वाजे पासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून या ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
याकारवाईत पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे , बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत , नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार , तसेच पोलीस अधिकारी , पोलिस कर्मचारी व नगरपरिषदेचेअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



