जळगावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या –

जळगाव : थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी आई बाहेर गेली असता घरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी शहरातील इंद्रप्रस्थ नगरात घडली. या प्रकरणी शहर पोलिीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राधिका भागवत भोसले (15) असे मयत मुलीचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गेल्या तीन दिवसांपूर्वी राधिका ही आई व बहिणींसह जळगावातील इंद्रप्रस्थ नगरात भाडे तत्वान घेतलेल्या घरात वास्तव्यास आले होते. शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी दुपारी आई ही थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी बाहेर गेली असता राधिकाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. थोड्याच वेळाने राधिकाची आई पंधरा ते वीस मिनिटांनी घरी आल्यावर मुलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. मुलीचा मृतदेह पाहून आईने जागीच आक्रोश केला. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.