भुसावळ : लेवा समाज शिक्षणाच्या बाबत मोठ्या प्रमाणावर प्रगत झाला असून शिक्षणासोबत आता संस्कारही जपणे गरजेचे असून अहमपणा निर्माण होवू न देता दोघांनी एकमेकांनी समजून संसार करावा व किरकोळ कारणावरून होणारे वाद टाळावेत, असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले. सकल लेवा पाटीदार समाजातर्फे युवक-युवती परीचय मेळाव्याचे शुक्रवार, 25 रोजी शहरातील संतोषी माता हॉलमध्ये आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खडसे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी 52 युवक-युवतींनी परीचय दिला तर वधू-वर परीचय पुस्तिकेचे प्रसंगी प्रकाशन करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे भोरगाव अध्यक्ष कुटुंबनायक रमेश विठ्ठू पाटील, आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक मुकेश पाटील, महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, औरंगाबाद मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे, उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, माजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटे, पुरुषोत्तम नारखेडे, महेश फालक, दिनेश पाटील, कौन्सिलर आरती चौधरी, नगरसेविका दीपाली बर्हाटे, प्रवीण पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्व पोटजातींनी एकत्र येण्याची गरज
माजी मंत्री खडसे म्हणाले, सुशिक्षीत आणि संस्कारीत समाजात निकोप नाते संबंध विकसीत होण्यासाठी स्नेह मेळाव्याची आवश्यकता आहे. सामूहिक विवाह पध्दतीच्या अवलंबामुळे वेळेसह पैशांची बचत होत असून हा पैसा मुला-मुलींचा संसार उभा करण्यास उपयोगात आणावा, असे आवाहन त्यांनी केले. लेवा समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीस हातभार लावल्यास लेवा समाजाची देखणी भव्य वास्तू लवकरच स्वरूप घेईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, दिनेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
वधू-वर परीचय सूचीचे प्रकाशन
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधू-वर परीचय सूचीचे प्रकाशन करण्यात आले. या मेळाव्यातस 52 विवाहेच्छूक युवक युवतींनी आपला परीचय दिला. मेळाव्यास भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, यावल, रावेर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, सुरत, बडोदा, अहमदाबाद आदी ठिकाणाहून समाजबांधव आले होते.
आमदारांनी जाहीर केली 25 लाखांची मदत
लेवा पाटीदार समाजासाठी हॉल बांधण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी 25 लाखांचा निधी देण्याचे प्रसंगी जाहीर केले तर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शहरातील रींग रोडवरील त्यांच्या मालकीच्या असलेल्या ओपन प्लेसची जागा समाजासाठी देण्याची घोषणा केली. या जागेवर हॉलची बांधणी करावी, असे त्यांनी सांगितल्याने त्यांचा व आमदार सावकारे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम मोलाचे
यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, प्रदेश संघटक रुपेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भारंबे, शुभम पाटील, नीरज किरंगे, गिरीश पाटील, अमोल महाजन, भालचंद्र चौधरी, कल्पेश पाटील, संकल्प वाणी, राहुल नेमाडे, निलेश राणे, सागर भारंबे, ओम वाणी, ऋतिक फालक, रुपेश पाटील, विशाल नारखेडे, निखील रडे, आर्य चौधरी आदींनी परीश्रम घेतले. आभार प्रा.मुकेश चौधरी यांनी मानले.


