जिल्ह्यातील 48 ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान


जळगाव -जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होऊन 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूक कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमधील 42 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.
दरम्यान,मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हयातील 11 तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमध्ये 18 जानेवारी रोजी मतदान होणार असून 19 जानेवारी रोजी मतमोजणी आहे. त्यानुसार ज्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये 21 डिसेंबर व 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्या त्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
सदर सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागात येणार्‍या कारखाने, दुकाने इ. लागु राहिल. ( राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुाकने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाटयगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर रिटेलर्स इ.)यांचा समावेश राहील.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहेत.