बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा – वरणगाव शिवसेनेची मागणी : कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी : पोलीस स्टेशनला दिले निवेदन :

  • वरणगाव – बंगरूळ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्वरित त्वरित अटक करावी. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शुल्लक गोष्ट असल्याचे बोलल्याचा निषेध करण्यासाठी वरणगाव शिवसेनेतर्फे आज सायंकाळी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांना निवेदन देऊन त्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

कर्नाटक राज्यातील बंगलोर येथील काही समाजकंटकांनी महाराष्ट्रसह संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही माथेफिरू समाज कंटाकांनी शाई फेक करून विटंबना केली. विटंबना झाल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांनी ही घटना शुल्लक आहे. असे बोलून त्यांनी त्या घटनेला समर्थन दिल्याचे दिसून आले. या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना शहरतर्फे आज रविवार सायंकाळी बस स्टॅन्ड चौकात कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटाकाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांना निवेदन देऊन त्या समाज कंटाकाला त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, जिल्हा संघटक विलास मुळे, उप जिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे सर, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, पं. स.सदस्य विजय सुरवाडे, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, हिप्पी शेठ, शेख सईद शेख भिकारी, संतोष माळी, निलेश ठाकूर, मनोज वाणी, प्रल्हाद. माळी, विवेक माळी, प्रशांत माळी, शुभम माळी, दिपक शेळके, पवन चौधरी, दिपक बढे, उमाकांत झांबरे, यशवंत बढे, राहुल वंजारी, अरबाज पहेलवान यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.