आर्या फाउंडेशन संचालित हिरकणी महिला मंचतर्फे कॅन्सर निदान व तपासणी शिबिर संपन्न : कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांनी केले मार्गदर्शन :


भुसावळ – येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधे आर्या फाउंडेशन संचालित हिरकणी महिला मंचच्यावतीने शनिवार दिनांक १८ रोजी कॅन्सर निदान व तपासणी शिबिर घेण्यात आले .
या प्रसंगी जळगांवचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे (Surgical Oncology)
यांनी शिबिरात सहभागी महिला संघटनेच्या महिलांना महिलांमधील वाढते कॅन्सरचे प्रमाण याविषयावर मार्गदर्शन करून उपयुक्त माहीती देवून त्यांची तपासणी केली .
या वेळी हिरकणी महिला मंचच्या सदस्यानी डॉ. अतुल भारंबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . महिलामधे गेल्या 10 वर्षात 25% कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे . त्याचसाठी अशा आशयाची शिबिर घेणे आवश्यक झाले असून महिलां मधील कॅन्सर विषयी भीति नष्ट होऊन
योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेणे गरजेचे असल्याचे शिबिराचे प्रस्तविकात डॉ वंदना वाघचौरे यांनी सांगितले.
यानंतर उपस्थित विविध महिला संघटने मधील महिलांचीं डॉ अतुल भारंबे यांनी तपासणी केली.
या प्रसंगी सखीश्रावणी महिला बहुउद्देश्यीय संस्था अध्यक्ष सौ राजेश्री नेवे व त्यांच्या पदाधिकारी महिला ,तसेच महिलां क्रीड़ा मंडळाच्या अध्यक्ष सौ आरती चौधरी व त्यांच्या पदाधिकारी महिला ,आणि ज्वाइंट्स वसुंधरा सहेली गृप व त्यांच्या पदाधिकारी महिला, भुसावळ महिला वकिल संघाच्या अध्यक्ष अँड जास्वन्दी भंडारी व अँड मनीषा बाविस्कर तसेचभुसावळ बाजरपेठ पोलीस स्टेशनच्या महिलां पोलिस अधिकारी व कर्मचारी , शासकीय महिला कर्मचारी तसेच व इतर संघटनाच्या महिला वर्ग आवर्जून उपस्थित होते .
यास्तुत्य उपक्रमाचे सूत्रसंचालन अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्या सौ मनीषा बाविस्कर यांनी केले . शिबिराच्या यशस्वितेसाठी संदीप तायड़े सौ .पौर्णिमा मसाने , सरोजिनी रामटके, अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी , व नवजीवन व्यसनमुक्ति केंद्राचा स्टाफ तसेच सर्व हिरकणी गृप सदस्य यांनी परिश्रम घेतले..